google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पेट्रोल , डिझेलच्या भाववाढीचे परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने तूर , मूग , उडीद डाळ पुन्हा शंभरीच्या पार

Breaking News

पेट्रोल , डिझेलच्या भाववाढीचे परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने तूर , मूग , उडीद डाळ पुन्हा शंभरीच्या पार

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - ग्राहक जेव्हा दुकानदारांकडून तूर डाळीचा भाव ऐकतात तेव्हा है त्यांचे डोळे पांढरे होत आहेत . कारण , तूरडाळीचे भाव पुन्हा एकदा शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत . पेट्रोल , डिझेलच्या भाववाढीचे परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने दिसायला लागले आहे .


तूरडाळीच्या भावात १००० रुपये वाढ होऊन सध्या १०,००० रुपये क्विंटल विकते आहे तर किरकोळ विक्रीत ११० रुपये किलोने तूरडाळ प्र ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे . तूरडाळीपाठोपाठ मूगडाळचे भाव ५०० रुपयांनी वधारून १५०० रुपये : किंटल विकत आहे . ही डाळ १०० ते १०५ रुपये किलोने विकत आहे . या दोन्ही डाळी महागल्यानेसर्वसामान्य हैराण झाले आहेत.उडीद डाळही ९ ५०० रुपये तर मसूरडाळ ७५०० रुपये क्विटल विकली जात आहे . ग्राहकांना थोडा दिलासाम्हणजे सर्वाधिक विक्री होणाऱ्या हरभराडाळीचे भाव ५५०० रुपयांवर स्थिर आहेत . आयात कमी झाल्याने व मागणी वाढत असल्याने डाळीचे भाव वधारल्याचे होलसेल व्यापारी संदिप चौगुले यांनी सांगितले . या डाळी महागल्याने महिन्याचे बजेट विघटल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करत आहे . तुर डाळचा हमीभाव ६००० रुपये आहे . ७० टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तूर ६००० रुपये प्रति क्विंटलने व्यापाऱ्यांना विकली . आता मोठे व्यापारी , कंपन्यांकडे तुरीचा मोठया प्रमाणात साठा आहे . आता तूर ७००० रुपये प्रतिक्विटल विक्री होत आहे . हमीभावापेक्षा जास्त किमतीचा फायदा शेतक - यांपेक्षा भांडवलदार व्यापाऱ्यांनाच होत आहे .

Post a Comment

0 Comments