google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चिंचली ( ता. रायबाग ) येथील मायाक्का देवीची प्रसिद्ध यात्रा २६ फेब्रुवारी पासून

Breaking News

चिंचली ( ता. रायबाग ) येथील मायाक्का देवीची प्रसिद्ध यात्रा २६ फेब्रुवारी पासून

 चिंचली ( ता. रायबाग ) येथील मायाक्का देवीची प्रसिद्ध यात्रा २६ फेब्रुवारी पासून


चिंचली ता रायबाग जि.बेळगाव येथील मायाक्का देवीची प्रसिद्धी यात्रा अखंडपणे यावर्षीही भरण्यात येणार आहे. कोरोना मुळे सर्व यात्रा रद्द झाल्या असल्या तरी मायाका देवीच्या यात्रेत मात्र खंड पडणार नाही. मायाक्का देवस्थान विश्वस्त समितीने ही माहिती दिली आहे. गेल्यावर्षी यात्रा संपल्यानंतर कोरोना चा फैलाव सुरू झाला. त्यानंतर वर्षभरात महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील सर्वच यात्रा रद्द झाल्या होत्या. मायाक्का देवीच्या यात्रेत मात्र खंड पडणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देवस्थान समितीने याबाबत माहिती दिली आहे की २६ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत यात्रा भरणार आहे. २ मार्च हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी महानैवेद्य देवीची पालखी मिरवणूक निघेल. महाराष्ट्र व कर्नाटकात चिंचली यात्रा नावाने ही यात्रा प्रसिद्ध आहे. लाखो भक्त बैलगाडीने यात्रेसाठी जातात , शेकडो खाजगी बस येतात कोरोना चा संसर्ग सध्या अत्यल्प असल्याने यात्रा भरवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

Post a Comment

0 Comments