google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी महसूल विभागाकडे दुसऱ्या टप्प्यात २८ कोटी ६२ लाख ६६ हजार रु . अनुदान प्राप्त : तहसीलदार अभिजीत सावरडे - पाटील

Breaking News

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी महसूल विभागाकडे दुसऱ्या टप्प्यात २८ कोटी ६२ लाख ६६ हजार रु . अनुदान प्राप्त : तहसीलदार अभिजीत सावरडे - पाटील

 सांगोला / प्रतिनिधी : जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये परतीच्या पावसामध्ये अर्थात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी तालुक्यातील जिरायत बागायत व फळ बागायतदार शेतक - यांच्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी एकूण ५१ हजार ६२५ लाभार्थ्यांच्या नुकसानीपोटी एकूण ६५ कोटी रुपयांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे सांगोला महसूल प्रशासनाकडून केली होती


. पैकी महसूल प्रशासनाकडून यापूर्वी पहिल्या टप्प्यात ५० टक्के अनुदान अर्थात २८ कोटी ६२ लाख ६० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत . तर आतादुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासनाकडून उर्वरित ५० टक्के म्हणजेच २८ कोटी ६२ लाख ६६ हजार रुपयेचे अनुदान प्राप्त झाले आहे . सदर अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत सावरडे - पाटील यांनी दिली आहे . सांगोला शहर आणी तालुक्याला जून ते ऑक्टोबर दरम्यान परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले होते . यामध्ये शेतकन्यांच्या शेतातील शेतीपिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . यामध्येसांगोला तालुक्यातील ९ ८ गावतील एकूण ५१ हजार ६२५ लाभार्थ्यांच्या जिरायत व बागायत मधील नुकसान पोटी महसूल प्रशासनाकडून गाव कामगार तलाठी , कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्याकडून पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता . तसेच सदर नुकसानीपोटी ६५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती . या मागणीवर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी पहिल्या टप्प्यात २८ कोटी ६२ लाख ६० हजार रुपये कार्यालयाकडे प्राप्त झाले होते . प्राप्त रकमेतून नुकसानग्रस्त लाभार्थ्यांच्या बँक अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली होती . जिरायत व बागायत प्रति हेक्टरी १० हजार रुपयांचे अनुदान शेतकन्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार होते . सदर अनुदान जमा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतातील शेती पिकांचे व फळबागांचे नुकसानीबाबत चे पंचनामेगाव कामगार तलाठी , मंडळ अधिकारी , कृषी सहाय्यक यांच्यामार्फत करण्यात आले होते . सदरचे पंचनामे व त्याबाबतचा अहवाल तातडीने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते . त्यानुसार तालुक्यातील शेतकन्यांच्या नुकसानीपोटी पहिल्या टप्यातील अनुदान प्राप्त झाले होते . उर्वरित अनुदान मिळावे महसूल प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जात होता . सदर पाठपुराव्यावरून दुसऱ्या टप्प्यातील ही अनुदान महसूल प्रशासन कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे . सदर अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments