google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 *कर्मवीर नगर मधील नागरिकांनी अखेर सोडला नि श्वास*

Breaking News

*कर्मवीर नगर मधील नागरिकांनी अखेर सोडला नि श्वास*

 *कर्मवीर नगर मधील नागरिकांनी अखेर  सोडला नि श्वास*             

गेली अनेक दिवस सांगोला शहरातील कर्मवीर नगरातील नागरिक घुबडांच्या त्रासामुळे दहशतीत होते रोज नित्यनेमाने दिवस मावळल्यानंतर घुबड लहान मुल नागरिक व महिलांच्या वरती हल्ला करत होते त्यामुळे कर्मवीर नगरातील बहुतांश नागरिक संध्याकाळ होताच दहशतीत वावरत होते याची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागात दिली त्यानुसार वन विभागातील कर्मचारी व अधिकारी घटनास्थळाला भेट देऊन आले परंतु घुबडांचे हल्ला करण्याचे कारण स्पष्टपणे समजले नाही   सांगोला वन विभागाचे वन रक्षक श्री धनंजय देवकर यांनी याबाबतची माहिती मला दिली त्यानुसार मी व देवकर साहेब तसेच सर्पमित्र संदेश पलसे मिळून त्या ठिकाणी निरीक्षण केले असता माझ्या नजरेस घुबडाची लहान पिल्ले आढळून आली त्यामुळे नागरिकांवर हल्ला करण्याचे कारण स्पष्ट झाले आपली पिल्ले लहान  असल्यामुळे नागरिक जवळून गेल्यानंतर पिलांचे आई-वडील स्वतःच्या बचावासाठी व पिलांच्या रक्षणासाठी जवळून जाणाऱ्या माणसां वर झडप घालून धुडकावून लावत असल्याचे स्पष्ट झाले  या संदर्भातील माहिती वसाहतीतील नागरिकांना  कथन केल्यानंतर नागरिकांनी नीश्वास सोडला  त्याच बरोबर नागरिकांनी संबंधित पक्षांना आणि पिलांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये पिले मोठी झाल्यानंतर ही जागा सोडून जातील व पक्षी तुम्हाला त्रास देणार नाही सदर वसाहतीतील नागरिकांनी घुबड या दुर्मिळ पक्षाचे संरक्षण केले पाहिजे असे सांगितले याप्रसंगी संदेश पलसे यांनी नागरिकांमध्ये सावधानता बाळगण्याचे आवाहन केले काही अडचण आल्यास तातडीने फोन करावा असे वन रक्षक धनंजय देवकर वनपरिक्षेत्र वनविभाग  सांगोला यांनी रहिवाशांना सांगितले

Post a Comment

0 Comments