सोलापूर दि.12: जिल्ह्यामध्ये 658 ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेच्या, निर्भय आणि नि:पक्षपाती वातावरणात व्हावी, कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री 14 जानेवारी (मतदानाचा अगोदरचा दिवस), 15 जानेवारी (मतदानाचा दिवस) आणि 18 जानेवारी 2021 (मतमोजणीचा दिवस) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा-1949 नुसार कलम 142 अन्वये जिल्ह्यातील सर्व एफएल-1, सीएल-2, एफएल-2, एफएलडब्ल्यू- 2, नमुना ई-2, सीएल-3, एफएल-3, एफएलबीआर-2, एफएल-4 आणि तात्पुरती क्लब मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.


0 Comments