google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माझी मम्मी ... ' माझ्या बहिणी आकांत , आक्रोश काळीज भेदणारा अपघात

Breaking News

माझी मम्मी ... ' माझ्या बहिणी आकांत , आक्रोश काळीज भेदणारा अपघात

 .. ... सांगोला: पंढरपूर सांगोला मार्गावर काल सायंकाळी झालेला अपघात काळीज चिरणारा थरारक प्रसंग .. माझी मम्मी , माझी मम्मी , माझ्या बहिणी कुठं आहेत ? हा आकांत आणि आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग पाहून मदतीला धावलेल्या नागरिकांचेही शब्द आणि भावना गोठून गेल्या होत्या . सांगोला तालुक्यातील हनुमंतगाव येथे आपल्या आईला भेटायला गेलेल्या पंढरपूरच्या शेटे कुटुंबावर संक्रातीच्या आदल्या दिवशीच काळाने घाला घातला .


सांगोल्याकडून परत येत असताना बिलेवाडी पाटीजवळ महिंद्रा , आयशर टेम्पो आणि मोटार सायकल यांच्यात झालेल्या या विचित्र आणि भीषण अपघातात शेटे कुटुंबातील बाप आणि चिमुरडी लेक जागीच ठार झाले आहेत तर त्यांची पत्नी आणि अन्य एक छोटी चिमुरडी गंभीर जखमी झालेले आहेत . अत्यंत भीषण आणि तितकाच अपघात परिसरातील नागरिकांनी पहिला . अपघात होताच आजूबाजूचे नागरिक धावून गेले पण दोघांचा जागेवरच मृत्यू झाला होता . राजेंद्र शेटे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर बाजूला काही अंतरावर त्यांच्या एका सहा वर्षाच्या नंदिनीचा मृतदेह पडलेला होता . अन्य दोन छोट्या मुली जखमी अवस्थेत बाजूला पडलेल्या होत्या . त्यातील एक मुलगी ' माझ्या बहिणी कुठं आहेत ' ? अशी विचारणा करीत होती तर दुसरी चार वर्षाची मुलगी ' माझी मम्मी माझी मम्मी ... ' असा आकांत करीत होती . तिच्या डोक्याला जबर मार लागलेला दिसत होता . पलीकडेच तिची आई अर्चना जखमी अवस्थेत होती परंतु काही समजण्याच्या ...अवस्थेत ती नव्हती . मम्मी मम्मी असा आकांत करणाऱ्या मुलीला तिची आई दाखवली पण तरीही ही मुलगी आपल्या आईला ओळखत नव्हती , यावरून तिच्या डोक्याला प्रचंड मार लागला असून ती कोणाला ओळखत नसावी याची जाणीव नागरिकांना झाल्यानंतर त्यांनीही हळहळ व्यक्त केली . मदतीला धावून गेलेल्या नागरिकांनी या मुलींची आई अर्चना यांना उठवून बसवले पण त्यांची उठण्यासारखी परिस्थिती नव्हती . त्यांचा एक पाय तुटला असल्याचे दिसत होते . अपघाताचा हा एकूण प्रकार अत्यंत थरारक आणि जीवघेणा होता . छोट्या मुलींचा आकांत आणि आक्रोश काळीज भेदणारा आणि अश्रू गोठवणारा होता . या सर्व प्रकारचे चित्रण नागरिकांनी केले आहे . दैनिक शोध न्यूज कडे हे चित्रण पोहोचले असले तरी ते न पहावणारे असल्याने येथे देणे जाणीवपूर्वक टाळले आहे . कुठल्याही शब्दात बांधता न येणारा हा अत्यंत करून प्रसंग नागरिकांनाही नव्हता . पंढरीच्या नामदेव मंदिर परिसरासह पंढरपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे .कदाचित .... मयत शेटे यांच्या मोटार सायकलवर त्यांच्यासह त्यांची पत्नी , तीन मुली असे पाच जण प्रवास करीत होते . दुचाकी वाहनावरून दोनपेक्षा अधिकजण घेऊन जाणारे अनेकजण रस्त्यावर दिसतात . असे गंभीर परिणाम सातत्याने समोर येत असतानाही हे प्रकार सर्रास पाहायला मिळतात . शेटे यांच्या दुचाकीवर दोघेच असते तर कदाचित ही घटना टळलीही असती ' माझी मम्मी ... ' माझ्या बहिणी आकांत , आक्रोश काळीज भेदणारा अपघात माझी मम्मी ... माझी मम्मी ... , माझ्या बहिणी कुठं आहेत ? हा आकांत आणि आक्रोश .. हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग पाहून मदतीला धावलेल्या नागरिकांचेही शब्द आणि भावना गोठून गेल्या होत्या

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
 .*सविस्तर बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नक्की फॉलो करा* 
💜👃🔷🔴🔵🔶👃💜
 *सांगोला तालुक्यातील तसेच परिसरातील बातम्यांचा आढावा घेणारे एकमेव न्यूज पोर्टल  फेसबूक  व्टिटर इंस्टाग्राम  गुगल इन आणि युट्युब चॅनेल पाहण्यासाठी या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा* 
💜💜💜💜💜💜💜💜
✍️✍️✍️🎤🎤🎤✍️✍️✍️
 *जाहिरात व बातमी साठी संपर्क*                          ⚕️ साप्ताहिक⚕️ ✍️✍️शब्दरेखा एक्स्प्रेस✍️
 ✍️मुख्य संपादक. श्री संतोष लक्ष्मण साठे✍️
9️⃣5️⃣0️⃣3️⃣4️⃣8️⃣7️⃣8️⃣1️⃣2️⃣ email.id.shabdhrekhaexpress@gmail.com.⭐RAG.NO.UDYAM-MH-32-0011113⭐

Post a Comment

0 Comments