सांगोला: भरधावट्रकचालकाने स्कूटीस जोराची धडक दिल्याने स्कूटीचालक ठार , तर एक मुलगी जखमी झाल्याची घटना मंगळवार , १२ जानेवारी रोजी सायं . पाचच्या सुमारास वाढेगाव सांगोला रोडवर घडली आहे . श्रीपाद दिगंबर कुलकर्णी ( वय ५२ , रा . सांगोला ) असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव होय . तर श्रुती श्रीपाद कुलकर्णी ( वय १ ९ ) ही मुलगी जखमी झाली आहे . श्रीपाद दिगंबर कुलकर्णी हे ( एम.एच .४५ एल .४०४ ९ ) या स्कूटीवरून मेडशिंगी येथे शेतात पूजेसाठी निघाले होते . दरम्यान , सोलापूरहून ( टी . एस . ०७ यू.एफ. ९ ६ ९ ० ) या क्रमांकाच्या ट्रकने माण नदी पुलाजवळ ( एम.एच .४५ एल ४०४ ९ ) या स्कूटीस समोरून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला .
0 Comments