सांगोला : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने
खालील प्रमाणे सक्त सूचना देण्यात येत आहेत...
1. विजयी मिरवणूक न काढणे
2. रॅली न काढणे
3. फटाके न फोडणे
4. गुलाल न उधळणे
5. विना परवानगी फ्लेक्स/ बॅनर न लावणे.
6. मोटर सायकल रॅली कोणीही काढणार नाही.
7. मोटरसायकलच्या सायलेन्सर ची पुंगळी कोणी काढणार नाही.
8. डॉल्बी डीजे / साऊंड सिस्टिम लावणार नाही.
9. पराभव झालेल्या उमेदवाराच्या घरासमोर विजयी उमेदवार अथवा कार्यकर्ते जाणार नाही.
10. मतमोजणीच्या ठिकाणी तहसील कार्यालय यांच्याकडून परवाना असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
11. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आत नेण्यास मनाई करण्यात आलेले आहे तरी मोबाईल कोणी घेऊन येणार नाही.
12. मतमोजणीच्या ठिकाणी शासकीय गोडाऊन येथे चारही बाजूने बॅरिकेट करण्यात आले असून सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
13. मत मोजणी वेळी प्रवेश करताना चार ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला पोलीस चेक करून आत प्रवेश देणार आहेत.
14. जे कार्यकर्ते रोडवरती अथवा अनाधिकृतपणे पार्किंग करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
वरीलप्रमाणे सक्त मनाई आदेश आहेत.
तसेच दि 18/1/21 रात्री *10:00* ते दि 19 सकाळी *6:00* पर्यंत सर्व हॉटेल,ढाबे,खानावळी, चायनीज, पान टपरी इ. बंद* राहतील
*सदर आदेशाची अंमलबजावणी कडक केली जाणार आहे*
*तरी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे .🙏🏻धन्यवाद🙏🏻*


0 Comments