google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी ! ढाबे, हॉटेलसाठी रात्री दहापर्यंतच वेळ; मतमोजणीच्या ठिकाणी 'यांनाच' परवानगी

Breaking News

निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी ! ढाबे, हॉटेलसाठी रात्री दहापर्यंतच वेळ; मतमोजणीच्या ठिकाणी 'यांनाच' परवानगी

 निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी ! ढाबे, हॉटेलसाठी रात्री दहापर्यंतच वेळ; मतमोजणीच्या ठिकाणी 'यांनाच' परवानगी


जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश...

अक्‍कलकोट, मोहोळ, बार्शी, माढा, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व माळशिरसमध्ये होणार मतमोजणी

मतमोजणी परिसरात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय अन्य व्यक्‍तींसाठी मोबाइल बंदी

तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, ज्वालाग्रही पदार्थ तथा घाऊक पदार्थ नेण्यावर निर्बंध


मतमोजणी केंद्र परिसरात अधिकारी व कर्मचारी, उमेदवार व त्यांचे दोन पासधारक प्रतिनिधींनाच असेल परवानगी

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर रॅली काढणे, गुलाल उधळणे, घोषणा देणे, फटाके वाजविणे, विनापरवाना बॅनर, फ्लेक्‍स लावण्यावरही बंदी

ग्रामीण हद्दीतील हॉटेल, धाबे, पान टपऱ्या 18 जानेवारीच्या रात्री दहा वाजल्यापासून 19 जानेवारीच्या सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार

सोलापूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततेत व विनाअडथळा, भयमुक्‍त वातावरणात पार पडावी, या हेतूने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 18 जानेवारी सकाळी आठ ते रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तत्पूर्वी, पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या पत्रानुसार असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments