google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गावांमध्ये रुटमार्च काढला . पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले

Breaking News

गावांमध्ये रुटमार्च काढला . पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले

 सांगोला ( प्रतिनिधी ) : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काल सोमवार दि .११ जानेवारी रोजी सांगोला पोलिसांनी महूद , जवळा , घेरडी , गावांमध्ये रुटमार्च काढला . पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात

आलेल्या


या पथसंचलनामध्ये पोलीस अधिकारी , ३५ पोलीस कर्मचारी , २१ होमगार्ड सहभागी झाले होते . या पथसंचलनामध्ये स.पो.नि.यमगर , स.पो.नि.हुले हे देखील उपस्थित होते . शुक्रवार दि .१५ जानेवारी रोजी सांगोला तालुक्यातील ६१ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे . यापैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या तरी ५६ ग्रामपंचायतीमध्ये प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरवात झाली आहे . या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिसांनी घेरडी या केले . महूद , जवळा , ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले . निवडणुक हा लोकशाहीचा एक अविभाज्य भाग आहे . जनतेला आपला लोकप्रतिनिधी ठरविण्याचा अधिकार घटनेने दिला आहे . त्यामुळे निवडणुकांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी प्रत्येकांनी घ्यावी या उद्देशाने पथसंचलनाचे नियोजन करण्यात आले होते . आज मंगळवारी नाझरा , कोळा , जुनोनी येथे पथसंचलन होणार आहे .

Post a Comment

0 Comments