सोलापूर : बाळंतपणाचे प्रमाण वाढण्यासाठी 107 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेबाबत जनजागृती करा . सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे लिंग गुणोत्तर कमी असल्याच्या कारणांचा शोध घ्या ,
जिल्ह्यात 0 ते 6 वर्षे वयोगटातील लिंगगुणोत्तर 960 इतके झाले आहे . आणखी मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात . शासकीय दवाखान्यातील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले .जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय टास्क फोर्स बेटी बचाओ , बेटी पढाओ समितीच्या आढावा बैठकीत श्री . शंभरकर बोलत होते . यावेळी महिला व बाल विकासचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख , महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सोमनाथ लामगुंडे , जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे , महिला व बाल विकास अधिकारी एन . एस . काळे , पोलिस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले , गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र ( लिंग निवडीस प्रतिबंध ) कायदाच्या ( पीसीपीएनडीटी ) जिल्हा समन्वयक ऍड . रामेश्वरी माने , प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी मिलिंद मोरे , बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ . विजय खोमणे , सुधीर ढाकणे आदी उपस्थित होते .श्री . शेख यांनी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरची तालुकानिहाय स्थितीची माहिती दिली . श्री . शंभरकर म्हणाले , जिल्ह्यात शासकीय आरोग्य यंत्रणेचे जाळे मोठे आहे . राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ( एनएचएफएस ) मधील बाबींचे प्रमाण वाढण्यासाठी आरोग्य , शिक्षण आणि बाल विकास विभागाने करावे . सोनोग्राफी केंद्रांची धाडसत्रे करून वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या . दत्तक पालक योजनेचे नियोजन जिल्ह्यातील अंगणवाड्यांना पोषण अभियानांतर्गत आहाराचे वितरण करण्यात येत आहे . अंगणवाड्या आयएसओ करण्याचे उद्दिष्ट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असून , सामाजिक उत्तर दायित्व निधीमधून नियोजन सुरू आहे . कमी वजनाची बालके सामान्य स्थितीत येण्यासाठी " दत्तक पालक योजना ' राबविण्यात येणार आहे , असे श्री . शेख यांनी सांगितले .


0 Comments