सांगोला ( प्रतिनिधी ) : - ग्रामपंचायत निवडणूक पक्ष , पार्टीवर न होता गावातील हितसंबंध , नाती - गोती , मैत्री , एकमेकाच्या सुख - दुःखात कोण सहभागी झाले . अडचणीच्या वेळी कोण कोणाच्या मदतीला धावून आले , यावर होत असतात . असे असले तरी आजच्या काळात अनेकजण मतदारराजावर विश्वास ठेवायला तयार नाही . त्यामुळे उमेदवार , नेतेमंडळी मतदारांना प्रलोभने दाखवून त्याच्याकडून भंडारा , गुलाल शिवून मतांची गोळाबेरीज करीत असल्याची चर्चा सुरु आहे . सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी रोजी निवडणुक होत आहे . या निवडणुका अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या होणार आहेत . सांगोला तालुक्यात अनेक ठिकाणी दुरंगी , तिरंगी तर काही गावात चौरंगी लढती होत आहेत . मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने थंडीत , पहाटेपर्यंत मतदारांचे उंबरठे झिजवू असून भावी ग्रा.पं.सदस्यांची घालमेल वाढली आहे . गावात जिथे भेट होईल त्या ठिकाणी यंदा आमच्यावर लक्ष ठेवा , अशी विनंती करुन सर्वांच्या पाया पडू लागले आहेत
. निवडणुकीत हळूहळू चांगलाच रंग भरू लागला आहे , उरलेल्या दिवसात मतांची जुळवाजुळव व उमेदवारांना मतदारांनी केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेवरच विजयाचे गणित असल्याचे चित्र सध्या दिसत आहे . ग्रामीण भागात आघाडी , युती , पक्ष , पार्टीचे उत्साही कार्यकर्ते यांच्याकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे सध्या दिसून येत आहे . मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीचा अवलंब केला जात आहे . सोशल मीडियावर उत्साही कार्यकर्ते उमेदवारांच्या नावांसह त्यांचा भावी सरपंच अशा पोस्ट प्रसारित करीत आहेत .


0 Comments