google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान सांगोला येथे संपन्न

Breaking News

३२ वे रस्ता सुरक्षा अभियान सांगोला येथे संपन्न

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी वर्षाच्या प्रारंभी रस्ता सुरक्षा अभियान नियोजित असून , यावर्षी १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत या अभियानाचे नियोजनानुसार सांगोला येथे वाहन चालक , मालक यांना तसेच सांगोला येथील मासिक दौरा शिबिरातील अर्जदारांना वाहतूक नियम व चिन्हे यांचे अनुपालन दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट वापरणे , चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करणे ,


मद्यप्राशन करून वाहन न चालवणे , वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे , तसेच इतर अनेक नियमाबद्दल प्रबोधन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यामार्गदर्शनाखाली वायुवेग पथकातील अधिकारी , मोटार वाहन निरीक्षक युवराज स पाटील , मोटार वाहन निरीक्षक नारायण आर पाटोळे , चालक संतोष मकरे यांच्यासोबत वाहन वित्रक तांबोळी होंडा व ओम साई हिरो वित्रक कुमठेकर , तसेच तांबोळी बजाज , बंडगर मोटर ड्रायव्हिंग स्कूल , श्रीराम मोटर ड्रायव्हिंग स्कूल , व कल्याणी मोटर ड्रायव्हिंग स्कू ल यांनी सदर अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेतला . आज रोजी उपस्थित सहभागी वितरक व मोटार ड्रयव्हिंग स्कूल यांचे प्रतिनिधी वाहन प्रतिनिधी यांनी हेल्मेट रॅली काढून रेस्ट हाऊस ते एस.टी. स्टॅन्ड मार्गाने घेऊन हेल्मेट वापराबाबत वाहतुकीचे व रस्ता सुरक्षा व नियमांचे महत्त्व पटवून दिले .

Post a Comment

0 Comments