सांगोला : माणनदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा करून पिकअप व टेम्पोद्वारे चोरून वाहतूक करताना सव्वा ब्रास वाळू , २ लाखाचा पिकअपव १ लाखाचा टेम्पो असा सुमारे ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
. ही कारवाईश्जानेवारीला पहाटे चारच्या सुमारास वाटंबरे ( ता . सांगोला ) स्मशानभूमी येथे केली . याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल लालासाहेब कदम यांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला . सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले , पोलीस शिपाई लालासाहेब कदम , काशीद हे वाटंबरे हद्दीत पेट्रोलिंग करताना माण नदीपात्रात दीपक दत्तात्रय पवार , सुनील ऊर्फ सोनू भारत पवार , तुषार ऊर्फ बंडू गोटू पवार , शेखर किसन शिंदे , गोविंद ऊर्फ शशिकांत रावसाहेब पवार हे वाटंबरे येथील स्मशानभूमीजवळ माण नदीतून विनापरवाना चोरून टेम्पो व पिकअपमध्ये वाळूभरताना मिळून आले . तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत .


0 Comments