सांगोला :तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या ५३९ जागेसाठी २६५ मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळी शांततेत सुरू सुरुवात झाली . सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रावर महिला , पुरुष , ज्येष्ठ व तरुण मतदारांची मतदानासाठी गर्दी केली होती . दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाजेपर्यंत २६५ मतदान केंद्रावर १ लाख ६४ हजार ०४४ मतदारांपैकी ६२ हजार ८३२ स्त्री व ७१ हजार ९ ४४ पुरुष अशा एकूण १ लाख ३४ हजार ७७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .
५६ ग्रामपंचायतीसाठी ८२.१६ टक्के मतदान झाले असून सोमवार १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे . सांगोला तालुक्यातील ६१ पैकी ५६ ग्रामपंचायतीच्या ५३९ जागेसाठी २६५ केंद्रावर शुक्रवारी स . ७:३० वाजता मतदानास सुरळीत सुरुवात झाली . सकाळी सर्वच मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती मात्र ९ नंतर मतदान केंद्रावर गर्दी होण्यास सुरुवात झाली . आघाडी , पॅनल प्रमुखांचे पदाधिकारी , कार्यकर्ते आपापल्या प्रभागातील मतदारांना दुचाकी चारचाकी वाहनातून थेट मतदान केंद्रापर्यंत आणून सोडत होते .
सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या २६५ मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले . तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत पाटील , निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे , गटविकास अधिकारी संतोष राऊत , पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह भरारी पथकाच्या अधिकारी अधिकाऱ्यानी संवेदनशील मतदान केंद्रासह विविध मतदान केंद्रावर भेटी देऊन आढावा घेतला . जवळा येथील प्रतिष्ठेच्या व संवेदनशील ग्रामपंचायतीसाठी चुरशीचे मतदान होत असल्याने अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला .
दरम्यान सकाळी साडेसात ते दु . १:३० वाजेपर्यंत ५६ ग्रामपंचायतीसाठी ४३ हजार ९ ०१ स्त्री मतदार व ४५ हजार ८८० पुरुष मतदार असे एकूण ८ ९ हजार ७८१ ( ५४.७३ टक्के ) मतदान झाले होते . दु . १:३० ते ३:३० वाजेपर्यंत ५६ हजार ३७६ स्त्री मतदार तर ५९ हजार २५८ पुरुष मतदार असे १ लाख १५ हजार ६३४ ( ७०.४९ टक्के ) मतदान झाले होते . सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत २६५ मतदान केंद्रावर १ लाख ६४ हजार ०४४ मतदारांपैकी ६२ हजार ८३२ स्त्री व ७१ हजार ९ ४४ पुरुष असे एकूण १ लाख ३४हजार ७७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला .
५६ ग्रामपंचायतीसाठी एकूण ८२.१६ टक्के मतदान झाले असून विजयाचा गुलाल कोण उधळणार हे सोमवारी मतमोजणीनंतर समजणार आहे . दुपारनंतर प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढत चालली होती . ज्येष्ठ , वृद्ध , आजारी अंध , अपंग महिला पुरुष मतदारांना मिळेल त्या वाहनातून , पाठीवरून उचलून थेट मतदान केंद्रात नेऊन मतदान करून घेत होते . शिवसेना , राष्ट्रवादी , भाजप , शेकाप , आरपीआय , मनसे , काँग्रेसयांच्या कार्यकर्त्यात मतदानासाठी चुरस पाहायला मिळाली .
निवडणुकीच्या ५६ गावात दोन्हीही पार्टीच्या उमेदवारांनी बाहेरगावी असलेले मतदान खासगी , एसटी आदी वाहनातून बोलावून घेतल्याने निवडणुकीत मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढली आहे . ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले .


0 Comments