' यूज अॅण्ड थ्रो'च्या संस्कृतीने बरेच काही सोपे झाले आहे . रोजच्या व्यवहारात या गोष्टी समाधान देऊन जात असल्या तरी आयुष्य सोपं करणाऱ्या काही गोष्टींमुळे आयुष्याची वाट लागते याचे भान कोणालाच नाही
. चहाचे कागदी कप सध्या मानवी शरीराला आतून पोखरत असल्याचे व विविध आजारांची देणगी देत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे . कॅन्सरसह अनेक आजार ओढवून घेत आपणच आपले शरीर ' डिस्पोजेबल ' करीत आहोत . ' वापरा आणि फेका ' संस्कृती किती घातक
ठरू शकते , हे आयआयटी खडकपूरच्या प्राध्यापक आणि काही विद्यार्थ्यांच्या केलेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे . प्राध्यापक सुधा गोयल , वेदप्रकाश राजन , अनुष्का सोहेल यांनी हे संशोधन केले आहे . कागदाच्या कपांमध्ये खराब होऊ नये म्हणून फायब्रो फोबिक फिल्म लावण्यात आलेली असते . फिल्म पातळ अशा प्लास्टिकपासून बनवण्यात येते . वॉटरप्रूफ म्हणून लावण्यात येणारे हे आवरण गरम चहाने वितळते . एकावेळी २५ हजार मायक्रो कण वितळून चहासोबत आपल्या शरीरात जातात . मिठापेक्षाही लहान आकाराचे असल्याने आपल्याला दिसत नाही . या प्लॅस्टिकमध्ये घातक असा पारा आणि कॅडमियम अशा दोन प्रकारची रसायने असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे . दिवसभरात या कपात तीन ते चार वेळा चहा घेणाऱ्याच्या शरीरात दिवसाकाठी ७५ हजारांवर प्लॅस्टिककण जातात . त्यामुळे पचनसंस्थेला प्रभावित होते . किडनी , यकृत यासारख्या अवयवांवर परिणाम करून आतड्यांनाही त्रास होतो . थकवा , मेंदूचे आजार , उच्चरक्तदाब , नैराश्य यासारखे आजार माणसाला ग्रासू शकतात . गर्भवती महिलांनाही त्यापासून प्रचंड धोका होऊ शकतो . माणसाच्या शरीराला हळूहळू आतून पोखरणाऱ्या व विविध आजारांची भेट देणाऱ्या या वस्तूंचा आज सर्रास वापर होत आहे . मोठमोठे समारंभ , एवढेच नाही तर आंदोलनांमध्येही डिस्पोजेबल कप वापरले जातात . हाताळायला सोपे असलेल्या या कपांच्या आहारी जाऊन आज आपण आपल्या शरीराची वाट लावत आहोत . आयआयटी खडकपूर येथील या संशोधनानंतर आतातरी चहा , जेवण प्लास्टिक कप , प्लेट मध्ये घेणार नाही . याची काळजी घेणे गरजेचे आहे . नाही तर एक गोष्ट सोपी करण्याच्या नादात आपण आपलं आयुष्यच कठीण करून बसू . यात शंका नाही .


0 Comments