इंदापूर : लोकप्रतिनिधी कसा नसावा हे वारंवार दिसून येते पण लोकप्रतिनिधी कसा असावा हेच राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखवून दिले आहे ,
एका महिलेने संतापून ना . भरणे यांची गच्ची पकडली पण मंत्रीपदावर असतानाही भरणे यांनी या महिलेचा पाहुणचार करून परत पाठवले . इंदापूर तालुक्यातील रेडणी गावातील भरणे यांच्याच कार्यकर्त्यांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याने संबंधित कार्यकर्ता भरणे मामांच्याकडे गेला . भरणेमामा पोलिसात फोन करतील ही त्याची अपेक्षा होती . मामांनी मात्र आपण पोलीस प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही असे सांगितले आणि तो कार्यकर्ता निघून गेला . दुसऱ्या दिवशी मात्र रेडणी गावातील काही महिलांनी भरणेमामांच्या घरासमोरच उपोषण करीत पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली .याप्रकरणी ना . भरणे उपोषणस्थळी आल्यावर एका महिलेने त्यांची गच्ची पकडण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे . महिलेने मामांच्या शर्टला पकडल्यानंतरही भरणेमामा शांतपणे त्यांना समजावत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे . भरणेमामा मंत्रीपदावर आहेत आणि एवढा प्रकार घडल्यावर ते काहीही करू शकले असते पण अत्यंत संयम दाखवत त्यांनी हा सगळा प्रकार हाताळला . एवढेच नव्हे तर ' संबंधित महिला आणि त्यांचा मुलगा हा गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून माझा कार्यकर्ता आहे . त्याची आई मला थोरल्या बहिणीसारखी आहे . जनतेला एखाद्या प्रश्नाचा जाब विचारण्याचा अधिकार आहे ' असे मोठया मनाने त्यांनी सांगितले . ना . भरणे हे पोलिसांना बोलावून या महिलेला पोलिसांच्या ताब्यात देवू शकले असते पण तसेकाहीच घडले नाही उलट या महिलेशी त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि आपल्या घरी या महिलेचा पाहुणचार केला . भरणे यांच्या घरी या महिलेने चहा , बिस्कीट , नाष्टा केला आणि आपल्या गावी निघून गेली . असा दुर्मिळ प्रकार इंदापुरात पहायला मिळाला . इंदापूर तालुक्यात भरणे मामाचं कौतुक होत असून लोकप्रतिनिधी कसा असावा याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे .


0 Comments