सांगोला (प्रतिनिधी) सांगोला शहरातील कडलास नाका येथील जाकिर इंटरप्राईजेस या फर्म चा उद्घाटन सोहळा रविवार दि 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सांगोला नगरीच्या प्रथम नागरिक तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ राणीताई माने यांच्या शुभहस्ते आणि भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार व महायुतीचे गटनेते आनंदा भाऊ माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक जमीर मुजावर यांनी केले त्यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा सौ राणीताई माने म्हणाल्या जाकीर इंटरप्राईजेस या फर्ममुळे सांगोला शहराच्या वैभवात भर पडली आहे तसेच सांगोला शहरामध्ये व तालुक्यामध्ये वाढत्या बांधकामांचे प्रमाण पाहता सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांना प्लंबिंगसाठी लागणाऱ्या मटेरियल खरेदीसाठी परगावी जावे लागत होते हीच गरज ओळखून जाकीर मुजावर यांनी सांगोला शहरामध्येच प्लंबिंग मटेरियल व सॅनिटरीवेअर चे व्यवसाय सुरू केल्याने सांगोला शहरांसोबत तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होणार आहेत त्याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करून भविष्यकाळातील वाटचालीसाठी व्यवसायात प्रगती होवोत अशा शुभेच्छा मुजावर कुटुंबीयांना दिल्या
या उद्घाटनाप्रसंगी इंजि.संतोष भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जाकीर मुजावर हे आज जाकीर इंटरप्राईजेस या व्यवसायाचे मालक जरी असले तरी गेले पंचवीस वर्ष त्यांनी अहोरात्र कष्ट करून हा व्यवसाय उभा केला आहे त्याचा मी साक्षीदार आहे त्यासोबतच त्यांच्या स्वभावामुळे बांधकाम व्यवसायातील सर्वांचे ऋणानुबंध देखील जपत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे अशा प्रकारचे मनोगत व्यक्त करून इंजि.संतोष भोसले यांनी जाकीर मुजावर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी मुजावर कुटुंबीयांतर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आले
या उद्घाटन समारंभ सोहळ्याप्रसंगी सांगोला नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अब्दुलरहीम मुजावर, हाजी इब्राहिम मुल्ला, हाजी युसुफभाई मुल्ला,हाजी कलिमोद्दीन मुल्ला,नगरसेवक जुबेर मुजावर, इंजि.रमेश जाधव,निसार मुलाणी ( नेते ),सय्यद खतिब,फारुख मुल्ला,अकलाख इनामदार ,पत्रकार मिनाज खतीब,पत्रकार महादेव पारसे, रउफ मुजावर,तोफिक मुजावर, इर्शाद मुजावर सर ,खलील शेख,तोहीद शेख,रमजान मुलाणी, मुसा मुलाणी,सय्यद सर,शाहरुख मुलाणी,मिनाज मुलाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
उद्घाटन समारंभ सोहळ्याची सांगता या फर्मचे मालक उद्योगपती जाकिर मुजावर यांनी आभार व्यक्त करून केली.


0 Comments