google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव ; परभणीतील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच

Breaking News

आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव ; परभणीतील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच

 आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव ; परभणीतील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच




परभणी : देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलेलं असतानाच परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी ८०० कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली. तो बचत गटाच्यावतीने चालवला जातो. पोल्ट्री फॉर्ममध्ये ८००० हजार कोंबड्या असून, त्यापैकी ८०० कोंबड्या मरण पावल्या आहेत.

येथील जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल आले असून मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने सांगितले आहे. याची माहिती जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिली आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला असून मुंरुबा गावातील सर्व कोंबड्या आणि पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, येथील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे

दरम्यान, परभणीमधील मुरुंबा गावात बर्ड फ्लूच्या केसेस आढल्यामुळे येथील प्रशासन सतर्क झाले आहे. मुरुंबा गावातील 1 किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या तसेच पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहेत. शिवाय गावातल्या लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या भागात कुक्कुटपालकांची संख्या मोठी आहे. मुरुंबा, असोला या भागात 10 हजारपेक्षा अधिक कोंबड्या आहेत. या कोंबड्याच्या खरेदी विक्री आणि वाहतुकीवर दहा किलोमीटर परिसरात प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

मुरुंबा गावातली सर्व पक्षी नष्ट करण्यात येत असले तरी संपूर्ण परभणी जिल्ह्यात अलर्ट घोषित करण्यात आलाय. दरम्यान, स्थलांतरित पक्ष्यांमुळे जिल्ह्यात बर्ड फ्लू आल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जातोय. कोरोनाचं संकट संपूर्णत: दूर झालं नसताना आता बर्ड फ्लू आल्याने काळजी व्यक्त केली जात आहे

Post a Comment

0 Comments