श्रीमती भामाबाई जाधव यांनी दिला उपनगराध्यक्षा पदाचा राजीनामा
सांगोला/प्रतिनिधी :
सांगोला नगरपरिषदेच्या विद्यमान उपनगराध्यक्षा श्रीमती भामाबाई दशरथ जाधव यांनी त्यांच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा काल सोमवार दि. 11 रोजी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्याकडे दिला आहे.
श्रीमती भामाबाई जाधव यांनी दिलेला उपनगराध्यक्षा पदाचा राजीनामा नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी मंजूर केला असून हे पद रिक्त झालेले आहे. लवकरच उपनगराध्यक्षा पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येण्याची शक्यता आहे.
सांगोला नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षा महायुतीच्या असून बहुमत मात्र आघाडीकडे असल्यामुळे सुरुवातीपासूनच उपनगराध्यक्ष हे पद आघाडीकडे राहिले आहे. आघाडीकडून आतापर्यंत सुरेश माळी, चेतनसिंह केदार, सौ. स्वाती मगर आणि श्रीमती भामाबाई जाधव यांना प्रत्येकी एक-एक वर्ष संधी देण्यात आली होती. आता मात्र शेवटच्या वर्षी उपनगराध्यक्ष होण्याची संधी कुणाला मिळतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


0 Comments