google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वच्छ सर्वक्षण -२०२१ व माझी वसुंधरा अभियानासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज

Breaking News

स्वच्छ सर्वक्षण -२०२१ व माझी वसुंधरा अभियानासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज

 सांगोला ( प्रतिनिधी ) : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानासाठी सांगोला शहर व नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे दरम्यान , नागरिकांमध्ये स्वच्छ तेसंदर्भात जनजागृती व्हावी म्हणून शहरातील भिंतीवर प्रबोधनपर चित्रे काढण्यात आली आहेत


. त्यामुळे भिंती बोलू लागल्याचा आभास होत आहे . सांगोला शहरातील विविध भिंतींवर स्वच्छतेबाबत , निसर्ग संवधर्नाची चित्रे , पाण्याची बचत , स्वच्छतेचे महत्व , निसर्ग चित्रे , आदी कलाकृती चित्ररूपाने साकारल्या आहेत . यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे . स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानामध्ये शहरात नगरपालिका पदाधिकारी , मुख्याधिकारी कै लास कें द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ शाळा , स्वच्छ हॉटेल , स्वच्छ हॉस्पिटल , स्वच्छ कार्यालय , स्वच्छ सोसायटी असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत .

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून नागरिकांनी हरित शपथ घेण्याचे. आवाहन पालिकेने केले होते यासंदर्भात वेब पोर्टलवर नावनोंदणी करून डिजिटल स्वरुपात शपथ घेतल्याबद्दल प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे . २०२० प्रमाणेच यावर्षी सुद्धा सांगोला नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानात कंबर कसली असून , शहरात विविध कामांच्या माध्यमातून पालिका अव्वल स्थान मिळवण्यास प्रयत्नशील मुख्याधिकारी कैलास केंद्रे व नगराध्यक्षा राणीताई माने यांनी असल्याचे सांगितले .

Post a Comment

0 Comments