नगराध्यक्षा यांच्या 15 % निधीतून काम सुरू
सांगोला शहरातील प्रभाग क्र. 1 मधील जानकर वस्ती येथे समाजमंदिर कामाचे भूमीपूजन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांचे हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
हे समाजमंदिर बांधण्याच्या कामासाठीची महादेव जानकर यांनी 22 वर्षांपूर्वी ही जागा नगरपालिकेस बक्षीस म्हणून दिली होती. परंतू अद्यापपर्यंत तेथे कसलेही काम झाले नव्हते. हेच लक्षात घेऊन नगरसेवक आनंदा माने यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील नगराध्यक्षा यांच्या 15% रकमेच्या फंडातून हे काम मार्गी लावण्याचे ठरविले आणि आवश्यक त्या मंजूऱ्या मिळवून कामाचा काल शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आरोग्य सभापती सौ. छायाताई मेटकरी, गटनेते तथा नगरसेवक आनंदा माने, सोमनाथ ठोकळे, महादेव जानकर, सुरेश जानकर, दासू जानकर, काशिलिंग गावडे, दीपक श्रीराम, म्हाळाप्पा शिंगाडे, इंजि. आकाश करे यांच्यासह ठेकेदार प्रणय बुरांडे हे उपस्थित होते.
चौकट - वैशिष्ट्यपूर्ण योजना व नपा फंडामधील नगराध्यक्षा यांच्या 15% रकमेच्या फंडातून प्रभाग क्र. 1 मध्ये वाड्या वस्त्यांवरील पाणीपुरवठयाची कामे पूर्ण झाली असून बऱ्याच वर्षांपासून रखडलेले समर्थ निवास ते शफू बागवान घर व सुभाष इंगोले घर ते अभिमान इंगोले घरापर्यंत आरसीसी गटार बांधणे हे काम पूर्ण झाले असून लवकरच इतरही कामे मार्गी लागतील.
- आनंदा माने, गटनेते तथा नगरसेवक
चौकट 2 - महादेव जानकर यांनी या समाजमंदिराच्या कामासाठी स्वतःची 5 गुंठे जागा नागरपालिकेस बक्षीसपत्र करून दिल्याबद्दल मुख्याधिकारी केंद्रे यांनी त्यांचे आभार मानले. नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांचे हस्ते


0 Comments