google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोना महामारीचा मोठा परिणाम वीज महावितरण कंपनीवर झाला आहे

Breaking News

कोरोना महामारीचा मोठा परिणाम वीज महावितरण कंपनीवर झाला आहे

 सांगोला ( सोलापूर ) : कोरोना महामारीचा मोठा परिणाम वीज महावितरण कंपनीवर झाला आहे . या काळात वीजबिले जास्त आल्याने ग्राहकांनी वीजबिले भरली नाहीत . राज्य शासन वीजबिल माफीसाठी सध्या तरी ठाम नाही . त्यामुळे राज्य शासनाची वीजबिल माफीसाठीची भूमिका अस्पष्ट आहे . थकबाकीच्या रकमेत वाढच वाढ होत आहे .


सध्या घरगुती ग्राहकांकडे 8 कोटी 42 लाख तर व्यावसायिक ग्राहकांकडे 2 कोटी 70 लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती सांगोला महावितरणचे उपअभियंता आनंद पवार यांनी दिली . वाढत्या थकबाकीमुळे वीजबिल वसुलीचे आव्हान सध्या महावितरण कंपनीपुढे आहे .सांगोला उपविभागामध्ये महावितरणचे प्रामुख्याने घरगुती ग्राहक , व्यावसायिक ग्राहक , औद्योगिक ग्राहक व शेतकरी ग्राहक असे वेगवेगळे ग्राहक असून , वीज बिलाची माफी होईल , या आशेने शेतकरी वीजबिले भरत नाहीत . घरगुती , व्यावसायिक व औद्योगिक ग्राहक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनच्या परिणामामुळे वीजबिले भरत नाहीत . राज्य शासनाकडून वीज बिलाची माफी होईल या आशेवर ग्राहक आहेत . विद्युत कर्मचाऱ्यांपुढे ग्राहकांना वीजबिल भरण्याबाबत विनंती करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही . त्यामुळे वीज प्रवाह बंद करणे सध्यातरी शक्य नाही . परिणामी वसुली होत नाही , अशा दुहेरी कात्रीत कंपनी अडकली आहे . 2021 च्या नवीन वर्षात ही वीजबिलाची थकबाकी कशी वसूल करावी , याचे आव्हान महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यापुढे आहे . ग्राहक : ग्राहकांची संख्या : थकबाकी रक्कम घरगुती : 28755 : 8 कोटी 42 लाख • व्यावसायिक : 2846 : 2 कोटी 70 लाख • औद्योगिक : 760 : 1 कोटी 66 लाख सांगोला तालुक्यातील वीज ग्राहकांनी वीजबिले भरून महावितरण कंपनीस सहकार्य करावे . राज्य शासन सूट देण्याच्या मन : स्थितीत आहे असे वाटत नाही . आज ना उद्या वीजबिले भरावीच लागणार आनंद पवार , उपअभियंता , महावितरण , सांगोला उपविभाग कोरोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्रांवर याचा मोठा परिणाम झाला आहे . राज्य सरकारने या महामारीच्या काळातील सर्व प्रकारच्या ग्राहकांना विजबिल माफी द्यावी -धनंजय चव्हाण , शेतकरी

Post a Comment

0 Comments