
सांगोला तहसील कार्यालया बाहेर अनेक मुद्रांक विक्रेते आहेत परंतु काही जण स्टॅम्प विक्री करत नाहीत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांना लागणा-या स्टॅम्प मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काही नागरिकांनी सदरची बाब मा.दुय्यम निबंधक साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली असता मा.दुय्यम निबंधक यांनी मुद्रांक विक्रेते यांना तंबी देवून नागरिकांना स्टॅम्प मुद्रांक विक्री करा नाही तर परवाने जमा करा अशा प्रकारच्या सुचना केल्या आहेत.
तसेच काही परवाना धारक मुद्रांक विक्रेते यांनी शासनाने परवाना देताना घालून दिलेल्या नियम अटींचे पालन करून परवाना धारक मुद्रांक विक्रेता असा फलक लावलेला नाही. त्यामुळे नागरिकांना कोण मुद्रांक विक्रेता आहे हे शोधा शोध करावी लागते. त्यामुळे मुद्रांक विक्रेते यांनी शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी नुसार फलक लावून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी.

0 Comments