शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 17 डिसेंबरला राज्यभरात वंचित आघाडीचे धरणे आंदोलन
मुंबई (प्रतिनिधी ):- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार गुरुवार दिनांक 17 डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यभरात त्या - त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वंचित आघाडी हे आंदोलन करणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायदयात दुरूस्ती करणारा अध्यादेश त्वरित काढावा. व हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत हमीभाव मिळण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतूद करावी त्याची कठोर अंमलबजावणी करावी. केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. त्यामुळे शेतीच्या मालाची वाहतूक खर्चिक होणार आहे. त्यामुळे केंद्राने रेल्वेच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द करावा. त्याचबरोबर दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने मोदी सरकार करीत असलेल्या रेल्वे तसेच सर्व सार्वजनिक सेवेच्या खाजगीकरणाला विरोध करण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी करीत वंचित आघाडी संपूर्ण राज्यात 17 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करणार आहे.
1 Comments
उपक्रम राबविण्यासाठी हाती छान घेतला आहे, जिल्ह्यातील शेतक-यांनी पाठिंबा देऊन जिल्हाधिका-याचे कार्यालयात एकत्र यावेत हीच अपेक्षा.
ReplyDelete