google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पशुसंवर्धनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Breaking News

पशुसंवर्धनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पशुसंवर्धनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन



सोलापूर-:  सोलापूरच्या जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2020-21 या वर्षामध्ये विविध योजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी 11 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे यांनी केले आहे.

विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचीत जाती/ नवबौद्ध लाभार्थींना 75 टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना 75 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप करणे, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना 75 टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे या योजना राबविण्यात येत आहेत

Post a Comment

0 Comments