google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायततीची अधिसूचना जाहीर !

Breaking News

सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायततीची अधिसूचना जाहीर !

 

सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायततीची अधिसूचना जाहीर ! 


आज दिनांक १५/१२/२०२० रोजी ६१ ग्रामपंचायतीची निवडणूक अधिसूचना पंचायत समिती कार्यालय , तलाठी कार्यालय, ग्रा.प. कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर ग्रामपंचायतीची नामनिर्देशन पत्रे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन, सांगोला येथे स्वीकारली जातील त्याबाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे 

१) नामनिर्देशनपत्रे उमेदवारांकडून किंवा अशा उमेदवारांनी याबाबतीत लेखी प्राधिकृत केलेल्या त्याच्या प्रतिनिधीमार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिनांक 23/12/2020 (बुधवार) ते दिनांक 30/12/2020 (बुधवार) पेक्षा उशीरा नसेल अशा कोणत्याही दिवशी सकाळी 11.00 वाजेपासून ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत (शुक्रवार दिनांक 25/12/2020, शनिवार दिनांक 26/12/2020, रविवार दिनांक 27/12/2020 हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून ) या वेळात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन, सांगोला येथे ‍(ठिकाणी) स्वाधीन करण्यात येतील; 

 २. नामनिर्देशनपत्राचे नमूने उपरोक्त ‍ठिकाणी व वेळात मिळतील. 

 २ अ. सदर नामनिर्देशनपत्रे Online भरण्यासाठीpanchayatelection.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाऊन भरण्यात यावी तसेच नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी संबंधित गावचे सर्व महा ई सेवा केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

३. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन, सांगोला येथे (ठिकाणी) दिनांक 31/12/2020दिवशी (तारीख) (गुरुवार) रोजी सकाळी 11.00 वाजता (वेळ) नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येईल; 

४. उमेदवारी मागे घेण्याची नोटीस उमेदवारांकडून जातीने किंवा त्याने याबाबतीत लेखी प्राधिकृत केलेल्या व्यक्तींकडून वरील खंड (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे त्याच्या कार्यालयात दिनांक 04/01/2021 (सोमवार) रोजी मध्यान्होत्तर 3.00 पूर्वी स्वाधीन करण्यात येईल; 

 ५. निवडणूक लढविण्यात आल्यास मतदान दिनांक 15/01/2021 (शुक्रवार) रोजी ते सकाळी 7.30 वा.पासून सायंकाळी 5.30वा. पर्यंत या वेळामध्ये घेण्यात येईल. तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी ३५ निवडणूक निर्णय अधिकारी , ६१ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व राखीव ७ निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. एकूण ६१ ग्रामपंचायत साठी ३१० मतदान केंद्रे असून प्रभागांची संख्या २३७ व सदस्य संख्या ६५९ आहे.

Post a Comment

0 Comments