आणखी एकदा संघटनेच्या तर्फे निवेदन देतो की , दि .०६ / ११ / २०२० व दि .१३ / ११ / २०२० नुसार आपल्या कारखान्याकडे आंदोलन करतो म्हणुन निवेदन दिले होते व आम्ही आंदोलनास बसलो होतो त्यावेळी आपण वरील संदर्भाप्रमाणे पत्र देऊन आव्हे ते जांबुड बंधाऱ्यावरून आपल्या कारखान्यास ऊस वाहतुक करणारी अवजड वाहणे बंधाऱ्यावरून येण्याचे बंद करून त्यांना वाहतुकीस दिलेल्या रस्त्याने येण्यास सांगुन बंधाऱ्यावरून येण्याचे बंद करतो व कारवाई करतो असे पत्राद्वारे सांगितले होते.परंतु अद्याप असे न होता पुर्वीपेक्षा म्हणजेच निवेदन देण्याअगोदरपेक्षा जोमाने व जास्तीप्रमाणे आपल्या कारखान्यास ऊस घेऊन येणारी अवजड वाहने आहे ते जांबुड बंधाऱ्यावरूनच येत असून तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करून व आमच्या आंदोलनाची खिल्ली उडवून आपल्या कारखान्याला ऊस वाहतुक करत असलेल्या वाहकांना व वाहन धारकांना पाठिगी घालत आहात व बंधाऱ्याचे अप्रत्यक्षरीत्या नुकसान करण्याचा विडा उचलल्यासारखे वागत आहात हे असे दिसून येत आहे . तरी आपण आपल्या कारखान्यास होणारी वाहतुक ( अवजडपणे ) आहे ते जांबुड बंधाऱ्यावरून बंद करून त्यांना दिलेल्या मार्गाने सुरळीत वाहतुक करावी असे दि .०६ / १२ / २०२० पर्यंत नाही झालेतर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने दि .०७ / १२ / २०२० या दिवशी आपल्या कारखान्यासमोर आंदोलनासाठी बसत आहोत तरी होणाऱ्या सर्व शासकीय मानसिक व अन्य सर्व नुकसानास आपण कार्यकारी संचालक या नात्याने सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी . कळावे , आपला विश्वासू , टिप - * सोबत पाट - बंधारे विभाग यांचेपत्र * आपल्या कारखान्याकडून मिळालेले पत्र . माहितीसाठी प्रत : १ ) मा.सार्वजनिक बांधकाम विभाग , अकलूज २ ) मा.पोलीस उपअधिक्षकसोा.अकलूज . ३ ) मा.पोलीस निरिक्षकसो , अकलूज . ४ ) मा.उपप्रादेशीक विभाग , आरटीओ कार्यालय , अकलूज .
अतिशय धोकादायक रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर बंधार्यावरून पलटी झालेली चित्र




0 Comments