google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथील दुय्यम निबंधक श्री कोकाटे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी -रविंद्र कांबळे.

Breaking News

सांगोला येथील दुय्यम निबंधक श्री कोकाटे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी -रविंद्र कांबळे.

सांगोला येथील दुय्यम निबंधक श्री कोकाटे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी -रविंद्र कांबळे.


सांगोला (प्रतिनिधी) सांगोला दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने वागत आहेत तसेच सदर कार्यालयात दलाल व एजंट यांच्यावरती या कार्यालयातील कारभार चाललेला आहे. अधिकार्‍यांपासून ते शिक्के मारणाऱ्या पर्यंत आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याचे दिसून येत आहे .तसेच आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय खरेदी विक्री व्यवहार होत नसल्याची सांगोला मध्ये चर्चा आहे तसेच या कार्यालयामध्ये ठराविक दलाल व एजंट यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार होत आहेत तसेच हे दलाल व एजंट अधिकाऱ्यांचे नाव सांगून आर्थिक देवाण-घेवाण करीत आहेत त्यामुळे खरेदी विक्री करणाऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. तसेच श्री कोकाटे दररोज कोणत्या ना कोणत्या एजंट व दलाला बरोबर दुपारचे व रात्रीचे जेवण करण्यासाठी हॉटेल ढाबे याठिकाणी जात आहेत. ज्या एजंट बरोबर जेवायला जातात त्या एजंट चे दस्त लवकर केले जात आहेत त्यामुळे बाकीचे एजंट नाराज झाल्यामुळे अनेक वेळा वादावादी सुद्धा झालेली आहे अशा पद्धतीमुळे एजंट दलाल यांच्या मध्ये मोठे टोळीयुद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही .जाणीवपूर्वक काही कागदपत्रांमध्ये त्रुटी  काढून अडचण निर्माण करतात व तेच काम दलालांमार्फत आर्थिक देवाण-घेवाण करून केले जाते त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे अशा पद्धतीची तालुक्यामध्ये चर्चा आहे तसेच या कार्यालयाबाबत अनेक तक्रारी लोकांनी केलेले आहेत तरी वरील सर्व बाबी गोपनीय विभागामार्फत व एखाद्या सक्षम अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून सत्यता पासून सत्यता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर ती बडतर्फ ची  कारवाई करावी याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेले आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी हे सांगोल्यातील अधिकारी यांच्यावरती काय कारवाई करतात व दलालांना त्वरित बंद करून दलाल मुक्त व एजंट मुक्त कार्यालय करतात का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे

Post a Comment

0 Comments