सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : कडलासला जाण्यासाठी कारमध्ये बसवून नेऊन रस्त्यामध्ये कार थांबवून चालकासह चौघांनी मारहाण करून वृद्ध महिलेचे हातपाय बांधून जबरदस्तीने तिच्याकडील एक लाख वीस हजार रुपये किमतीचे साडे तीन तोळे सोन्याचे दागिने हिसकावून घेतले . ही घटना
बुधवार १६ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास जवळा ते कडलास रोडवर घडली . याप्रकरणी अज्ञात चौघांविरुद्ध सांगोला पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे . कडलास येथील बाजारात भाजीपाला विकण्यासाठी तरंगेवाडी ता.सांगोला येथे राहणाऱ्या छाया अशोक चोरमले वय ६५ ही वृद्ध महिला जवळा येथील चौकात उभ्या होत्या . त्यावेळी सांगोल्याकडे जाणारी एक पांढऱ्या रंगाची कार त्यांच्याजवळ आली . चालकाने वृद्ध महिलेला कुठे जायचे आहे अशी विचारणा करून तुम्हाला कडलासमध्ये सोडतो असे सांगत चारचाकी वाहनात बसवले . कडलासकडे जात असताना पेट्रोलपंपाजवळ कारचालकाने गाडी थांबवल्यानंतर त्यात तिघेजण बसले.यावेळी छाया चोरमुले यांनी गाडीतून उतरण्याचा । प्रयत्न केला . मात्र लुटारूंनी छाया चोरमुले यांचे तोंड - दाबून तोंडात रुमाल कोंबला तर दोघांनी कपड्याने र पाय बांधले . लुटारूंनी छाया चोरमुले या वृद्ध महिलेच्या । गळ्यातील सोन्याची बोरमाळ , दोन मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून काढून घेतले . तसेच शिवीगाळ , मारहाण करून - कानातील सोन्याचे वेल , फुले , झुबे , बुगड्या , कानातील मोत्याचा मगवट असे एक लाख वीस हजार रुपये सोन्याचे । दागिने जबरदस्तीने कात्रीने कापून घेतले . त्यानंतर । कडलास रोडवर असलेल्या कॅनॉलवरून जाणाऱ्या कच्च्या । रस्त्यावर घेऊन एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर निर्मनुष्य - माळरानावर गाडी थांबवून छाया चोरमुले यांना गाडीच्या - खाली ढकलून देऊन लुटारू पसार झाले . त्यानंतर चोरमुले यांनी भाचा शंकर बंडगर यांच्या मोबाईलवर फोन करून । घडलेला प्रकार सांगितला . याप्रकरणी छाया चोरमुले यांनी । अज्ञात लुटारूविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद । दिली आहे . दिवसाढवळ्या वृद्ध महिलेच्या अंगावरील , सोन्याच्या दागिन्यांची लूट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे - वातावरण निर्माण झाले आहे .


0 Comments