google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गेल्या पंचवार्षिकला ज्यानी खर्च सादर केला नाही त्यांना निवडणूक लढवता येणार नाही

Breaking News

गेल्या पंचवार्षिकला ज्यानी खर्च सादर केला नाही त्यांना निवडणूक लढवता येणार नाही

 सोलापूर ( दि .27 डिसेंबर ) : - मा . राज्य निवडणूक आयोग यांच्या कडील ११ जानेवारी २०१७ च्या पत्रकानुसार सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी गेल्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी जे उमेदवार होते , पण ज्या उमेदवारानी निवडणूकीसाठी किती पैसे खर्च केले याचा हिशोब मा . तहसील कार्यालयात सादरकेला नाही . अशा उमेदवारांना यावेळी निवडणूक लढवता येणार


नाही . मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १ ९ ५८ कलम १४ ब नुसार निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर १ महिन्याच्या आत निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असते . पण ज्या उमेदवारानी खर्च सादर केला नाही अशा उमेदवारानां यावेळी निवडणूक लढवता येणार नाही . ज्या उमेदवारांनी खर्च सादर केला नाही . अशा उमेदवारानांची यादी मा.राज्य निवडणूक आयोगाने ११ जानेवारी २०१७ रोजी एका पत्राद्वारे प्रसिद्ध केली आहे . त्यामुळे पार्टी प्रमुखांना उमेदवार निवडताना दुसऱ्या कागदपत्रांसोबत गेल्या वेळी लावलेल्या निवडणूकीचा खर्च सादर केला आहे की नाही याचाही विचार करावा लागणार आहे .

Post a Comment

0 Comments