google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वर्षभरातील कामगिरीबद्दल सांगोला पोलीस ठाण्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक : पो.नि राजेश गवळी

Breaking News

वर्षभरातील कामगिरीबद्दल सांगोला पोलीस ठाण्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक : पो.नि राजेश गवळी

 वर्षभरातील कामगिरीबद्दल सांगोला पोलीस ठाण्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक : पो.नि राजेश गवळी


२०२० मध्ये तालुक्यात घडलेल्या २० गंभीर गुन्ह्यातील १ ९ गुन्हे उघडकीस


 *अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ७९ , जुगाराचा संदर्भात ७४ तर अवैध दारू व्यवसायासंदर्भात २४६ गुन्हे दाखल

सांगोला तालुक्यातील जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० अखेरपर्यंत शरीराविषयी व मालाविषयी सांगोला तालुक्यात या वर्षभरामध्ये २० गंभीर गुन्हे घडले असून त्यातील १ ९ गंभीर गुन्हे हे उघडकीस आले आहेत . तसेच अवैध वाळू वाहतूक संदर्भात ७ ९ , अवैध जुगार संदर्भात ७४ , तर अवैध दारू व्यवसायासंदर्भात २४६ गुन्हे वर्षभरामध्ये दाखल करण्यात आले आहेत . 

पोलिस प्रशासनाच्या या वर्षभरातील कामगिरीबद्दल सांगोला पोलीस ठाण्याचा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक व उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग यांच्या वर्षभरातील कामगिरीबद्दल त्यांना देखील प्रथम क्रमांक देण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली . जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० अखेरपर्यंत सांगोला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शरीराविषयी व मालाविषयी मोठ्याप्रमाणावर गुन्हे घडलेल्ले आहेत . यामध्ये दरोडा , जबरी चोरी , खून , खुनाचे प्रयत्न , बलात्कार व इतर चोरी अशा गंभीर गुन्ह्यांचा कसोशीने व अत्याधुनिकतंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्याची उकल सांगोला पोलीस प्रशासनाने केलेले आहे .

सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती यांच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात आली असून सांगोला पोलीस प्रशासनाकडून आपल्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था प्रस्तावित करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले गेले आहेत . २०२० मध्ये ३ खुणा सारखे गंभीर गुन्हे घडलेले असून सदरचे सर्व गुन्हे उघडकीस आलेले आहेत . त्यामधील ५ आरोपींना अटक करण्यात आली असून या गुन्ह्यांची निर्गती करण्यात आलेली आहे . तसेच ९ ९ खुनासारखे प्रयत्न केल्यासारखे गंभीर गुन्हे घडले असून सदरचे ९ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत . यामध्ये २७ आरोपी निष्पन्न करण्यात आलेले २१ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे , व १ आरोपी अद्याप फरार असून ५ आरोपी अटकपूर्वला आहेत . २०२० मध्ये २ दरोडा सारखे गंभीर गुन्हे घडलेले असून सर्व गुन्हे उघडकीस आणलेले आहेत . या गुन्ह्याचे कसोशीने व आधुनिक असून २१यांचे कडू न १६ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत . 

सांगोला पोलीस प्रशासनाकडून सन २०२० मध्ये अवैध वाळू वाहतूक संदर्भात ७ ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामधील १८६ आरोपी निष्पन्न केलेले आहेत . तसेच ३ कोटी ४ लाख ६४ हजार रुपये चा माल हस्तगत करण्यात आला आहे . २०२० मध्ये जुगार संदर्भात ७४ केसेस करण्यात आल्या असून यामध्ये २० लाख ९ ६ हजार ७२ रु . चा माल हस्तगत करण्यात आला आहे . २०२० मध्ये अवैध दारू व्यवसायासंदर्भात २४६ केसेस केल्या असून १४ लाख ९ ५ हजार ८ ९ ० रु . चा माल हस्तगत करण्यात आला आहे . 

सांगोला पोलीस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २०२० या या वर्षात आलेल्या कोरोना महामारी चा प्रसार होऊ नये याकरिता प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे विना मस्क , सार्वजनिक ठिकाणी थुकणे , दुचाकीवर डबल शीट जाणे , निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान चालू ठेवणे असा प्रकार वेळोवेळी दिसल्याने आदेशाप्रमाणे १ ९ हजार ९ २० केसेस करून २६ लाख १६ हजार २५० रुपये दंडात्मक कारवाई केलेली आहे . तसेच विनाकारण फिरणाऱ्या २१६ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील काही तक्रारदाराने गंभीर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत . 

सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून त्या खोट्या असल्याचे सप्रमाण अहवाल न्यायालयात सादर केलेला आहे . पोलिस ठाणे हद्दीत परराज्यातील महिला आणून बेकायदा देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून त्यात लॉज मालकासह इतर स्टाफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून कारवाई करण्यात आलेली आहे . सांगोला पोलीस प्रशासनाची सदरची वर्षभराची कामगिरी लक्षात घेता जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वर्षभराच्या कामगिरीबद्दल त्यांचा देखील प्रथम क्रमांक आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली .

Post a Comment

0 Comments