सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी बुधवारी १५४१ इच्छुक उमेदवारांनी १५४४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत . आतापर्यंत सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी विक्रमी २५९६ इच्छुकांनी तब्बल २६०० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत .
आज गुरुवार ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून सोमवार ४ जानेवारी २०२० पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे . सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती . उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर उमेदवारी अर्ज दाखल संख्या गावनिहाय पुढीलप्रमाणे , आगलावेवाडी ३९ , आलेगाव ४५ , अचकदाणी ३० , अजनाळे २८ , अकोला ६५ , बामणी २३ , भोपसेवाडी ३२ , बुद्धेहाळ ३५ , बुरंगेवाडी ३७ , चोपडी ३३ , देवळे २३ , धायटी ५० , डोंगरगाव २९ , एखतपुर ५५ , गौडवाडी ३५ , गायगव्हाण ३५ , घेरडी ११६ , हटकर मंगेवाडी २१ , हलदहिवडी ४३ , हंगिरगे ६२ , हणमंतगाव २५ , हातीद ५५ , जवळा ७१ , जुजारपूर ३५ , जुनोनी ४८ , कडलास ६७ , कमलापूर ६१ , कटफळ ३३ , खिलारवाडी ६० , किडेबिसरी २४ , कोळा ९७ , लक्ष्मीनगर २४ , लोणविरे ४१ , लोटेवाडी ५६ , महिम ४१ , महूद ७९ , मानेगांव २० , मांजरी ४६ , मेडशिंगी ४६ , मेथवडे १८ , नराळे ३५ , डिकसळ ३८ , नाझरे ६४ , निजामपुर ३१ , पाचेगाव बु . ३३ , पारे ३८ , राजुरी २८ , संगेवाडी २ ९ , शिरभावी ५७ , सोमेवाडी ९ , तरंगेवाडी ४५ , तिप्पेहाळी १९ , उदनवाडी ३६ , वाकी घेरडी ३७ , वाणीचिंचाळे ३६ , वाटंबरे ३० , वझरे ४० , वाकी शिवणे ४८ , यलमर मंगेवडी ९५ , इटकी २३ , वासूद ४३ अशा ६१ ग्रामपंचायतीसाठी २५९ ६ इच्छुक उमेदवारांनी तब्बल २६०० अर्ज दाखल केले आहेत .



0 Comments