पारावर गावातील आबालवृध्द जमा झाले होते.सरकारने नुकताच ग्रामपंचायतीच्या निवडणूकिचा कार्यक्रम घोषित केला
होता.राजकारणातील हवस्या गवस्यांना आनंदाची भरती आली होती.मान्यता प्राप्त पक्षांनी दंड थोपटून निवडणूकिच्या आखाड्यात उतरविण्यासाठी उमेदवाराची शोध मोहीम राबवली होती.निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरे करणारे पक्ष निवडून आल्यावर लोकशाहीला काळीमा फासतात . लोकशाही मूल्यांनी राजव्यवहार न करता लोकशाहीती पायमल्ली करून स्वतःच्या पक्षाचा अजेंडा राबवतात.गावातील व देशातील वातावरण दुषित करतात.म्हणून जानकार मंडळीने या वर्षी पारंपारिक पक्षाच्या उमेदवाराला धडा शिकवायचा चंग बांधला . प्रदीपने आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून गावामध्ये नवे चैतन्य निर्माण केले.प्रतिष्ठीत नेत्यांना जमीनीवर आणण्यासाठी त्यांनी युवकांची मोट बांधली .निवडणूक फार्म भरण्याचा दिवस जस जसा जवळ येऊ लागला तस तसा मतदारांना लुबावण्यासाठी नेते अनेक प्रलोबने देऊ लागले.प्रदीपने आपल्या तरूण सहकार्याना घेऊन नवीन रणनीतीचा वापर केला.लोकशाहीतील मानवाचे हक्क व जबाबदाऱ्या यांची ओळख जनतेला देऊ लागला.सामूहिक समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी नवीन युवा परिवर्तन पॅनल तयार करून प्रस्थापित नेत्यांसमोर मोठे आव्हान उभे केले . गावातील वातावरणात निवडणूकिचा ज्वर संचारला होता.घरोघरी प्रचाराची रणधुमाळी माजली होती.आतापर्यंतच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका साध्यापणाने व्हायच्या सत्तेतील पक्ष फारसे सक्रिय राहात नव्हते पण नव्या साधन सामुग्रीचा उपयोग करून प्रिंट व मास मिडियांचा वापर होऊ लागला.पैशाच्या अतोनात वापराने निवडणूकेचे सत्यरूप लयास गेले होतेगावातील सौहार्द वातावरण राजकिय पक्षानी गढूळ केले होते.जाती - धर्माच्या नावाने समाजात विष ओकल्या जात होते.भारतीय गावातील धर्मनिरपेक्षतेला तडा गेला होता.मनामनात एकमेकांबद्दल शत्रूत्व निर्माण झालं होतं.यामुळे प्रदीप व युवा मित्र नाराज होते .त्यांनी युवा परिवर्तन पॅनल मधून आपली लढाई लढावी यासाठी गावातील लोकांना ते प्रेरित करत होते.गावाला कशाची गरज आहे हे लोकांना पटवून देऊ लागले.तुम्ही परिवर्तन पॅनल मत द्या किंवा देऊ नका पण आपल्या मताला विकू नका.आपले एक मत म्हणजे भारतीय संविधानातील आपली ताकत दाखवायचे अस्त्र आहे.त्याचा योग्य सन्मान करावा.गावातील नात्यागोत्याचे , प्रेमाचे संबंध बिघडवू नका.आपण सारे एक आहोत हा संदेश देण्याकरीता सर्वांनी राजकिय स्वार्थी पक्षापासून सावध राहावे.त्याच्या आमीशाला बळी पडू नये.म.जोतीराव फुले , छ.शाहू महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर , गाडगेबाबा , यांच्या कार्याची जाणीव ठेवून लोकशाहीला मजबूत करू या .या संदेशातून गावातील लोकांची मने जिंकली . निवडणूकचा दिवस आला.गावातील सारे तरूण मतदार व प्रौढ मतदारांनी कोणत्याही पक्षाच्या आमीशाला बळी न पडता मोठ्या उत्साहात आपले मतदान केले.गावातील मतदान जवळपास नव्वद टक्के झाले.प्रत्येक पक्ष आपआपले गणित जोडण्यात मग्न होते.काही नेत्यांनी पार्टीचा बेत रचला होता . आम्हीच कसे विजयी होऊ या आविर्भावात कार्यकर्ये वागू लागले.युवा परिवर्तन पॅनलचे कार्यकर्ये शांत व संयमी होते.उद्याच्या निकालातून गावाचे भविष्य ठरणार होते.मतमोजणीचा दिवस उजाडला .ठरल्या प्रमाणे मतमोजणीला सुरूवात झाली.मतमोजणीत सुरवातीपासून युवा परिवर्तन पॅनलने आघाडी घेतलीहोती.प्रस्थापित नेत्यांना व पक्षाना मोठा हादरा बसला होता.गावातील सर्व मतदारांनी लोकशाहीच्या मजबूतीसाठी संविधानात्मक संस्कृतीसाठी जात , धर्म , पंथ न पाहता युवा परिवर्तन पॅनलला भरघोस मत दिले होते.नवा विजयी आदर्श गावाने निर्माण केला होता.प्रदीपने या विजयाचे श्रेय गावातील लोकांना दिले.निवडणूकितून नवा आशावाद लोकांच्या मनात निर्माण झाला.निवडणूक म्हणजे भारतीय संविधानातील लोकशाही मूल्ये रूजवण्याची आदर्श पाठशाळा आहे .


0 Comments