google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आघाडी ! पंढरपूर , सांगोला अन् माढ्यात चुरस ; 658 ग्रामपंचायतींसाठी 8448 अर्ज

Breaking News

आघाडी ! पंढरपूर , सांगोला अन् माढ्यात चुरस ; 658 ग्रामपंचायतींसाठी 8448 अर्ज

 गावांमध्ये दिसेना महाविकास आघाडी राज्यात शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे . मात्र , ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी दिसत नसून प्रत्येकजण आपापल्यापरीने निवडणुकीच्या रिंगणात आपले नशिब आजमावू लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे . शिवसेना , भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्येच चुरस पहायला मिळत असून त्यांनी आपापले पॅनल निवडणुकीत उतरविले आहेत


सोलापूर : जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे . उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या ( बुधवारी ) सायंकाळी साडेपाचपर्यंत शेवटची मुदत आहे . आतापर्यंत जिल्ह्यातून आठ हजार 288 इच्छूकांनी आठ हजार 448 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत . विशेष म्हणजे आज ( ता . 29 ) एकाच दिवशी सहा हजार 21 उमेदवारांनी अर्ज केलेतालुकानिहाय उमेदवारी अर्ज ( कंसात ग्रामपंचायती ) करमाळा : 51 ( 603 ) , माढा : 82 ( 1013 ) , बार्शी : 96 ( 747 ) , उत्तर सोलापूर : 24 ( 229 ) , मोहोळ : 76 ( 1089 ) , पंढरपूर : 72 ( 1327 ) , माळशिरस : 49 ( 691 ) , सांगोला : 61 ( 1070 ) , मंगळवेढा : 23 ( 277 ) , दक्षिण सोलापूर : 52 ( 711 ) आणि अक्कलकोट : 72 ( 691 ) . बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी काही लोकप्रतिनिधींनी बक्षिस जाहीर करुनही ग्रामपंचायत निवडणुकीची चुरस वाढल्याचे चित्र आहे . दरम्यान , 23 नोव्हेंबरला निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली . पहिल्या दिवशी अवघ्या 23 उमेदवारांनी अर्ज केले होते . 24 नोव्हेंबरला तीनशे उमेदवारांचे 309 अर्ज दाखल झाले . त्यानंतर मात्र , तीन दिवस सुट्टी असल्याने 28 आणि 29 डिसेंबरला अर्जाची संख्या वाढली . 28 डिसेंबरला दोन हजार 95 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते . मात्र , मंगळवारी एकाच दिवशी तब्बल पाच हजार 916 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले . उमेदवारी अर्जाची संख्या वाढल्याने सर्व्हर डाऊन झाला . इंटरनेट स्लो झाल्याने आता ऑफलाइन अज स्वीकारले जाणार आहेत . मोहोळ , पंढरपूर , सांगोला आणि माढा या तीन तालुक्यांतील 291 ग्रामपंचायतींसाठी तब्बल चार हजार 489 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत .गावांमध्ये दिसेना महाविकास आघाडी राज्यात शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे . मात्र , ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी दिसत नसून प्रत्येकजण आपापल्यापरीने निवडणुकीच्या रिंगणात आपले नशिब आजमावू लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे . शिवसेना , भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्येच चुरस पहायला मिळत असून त्यांनी आपापले पॅनल निवडणुकीत उतरविले आहेत .

Post a Comment

0 Comments