मुंबई-महाविकास आघाडी सरकारने शालेय शिक्षण व्यवस्थेतील शिपायांची पदे रद्द केली आहेत .
यापुढे राज्यातील शाळांमध्ये शिपायी पदाची भरती होणार नाही असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे . यामुळे साधारण 52 हजार शिपायांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे .राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांपासून ते शिपायांपर्यंतच्या व्यक्तींचे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोठे योगदान असते . परंतु येत्या काळात राज्यातील सर्व शासकीय , खासगी शिक्षण संस्थांमध्ये असलेली शिपायांची पदे रद्द करण्यात येणार आहेत . राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे . परंतु या निर्णयामुळे राज्यातील 52 हजार शिपायांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते .


0 Comments