google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला जनावरांचा बाजार सुरू मा.आम दिपकआबा साळुंखे यांनी पशुपालक व व्यापाऱ्यांना दिली भेट 

Breaking News

सांगोला जनावरांचा बाजार सुरू मा.आम दिपकआबा साळुंखे यांनी पशुपालक व व्यापाऱ्यांना दिली भेट 


by Shabdhrekha express on December 13, 2020 


सांगोला : लॉक डाऊन कालावधीत करोनाचा तर अनलॉक मध्ये लंपी सारख्या संसर्गजन्य आजाराच्या भीतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात भरणारा बाजर बंद ठेवण्यात आला होता. व्यापारी व पशुपालकांडून बाजार सुरू करण्याची मागणी वारंवार केली जात होती.अखेर पशुपालक व व्यापारी यांनी होणारे नुकसान टाळण्यासाठी स्वतःहून बाजाराचे आयोजन केल्याने जनावरांचा बाजार सुरू झाला त्यामुळे व्यापारी,पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये समाधान. कृषी उत्पन्न बाजार सामीतिच्या पटांगणात तब्बल 22 मार्च पासून जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता. 

26 ऑक्टोंबरला एक दिवस भरला परन्तु लंपी या महाभयानक रोगामुळे जनावरांना संसर्ग होऊ नये यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडून जनावरांचा बाजार बंद ठेवावा लागला होता.दरम्यान लंपी चा प्रादुर्भाव कमी होऊन देखील बाजार सुरू करण्यास परवानगी मिळत नव्हती.याचा परिणाम व्यापारी व पशुपालक यांना मोठ्या नुकसानिस सामोरे जावे लागत होते.हा बाजार बंद असल्याने सांगोल्याच्या इतर आठवडा बाजारावर देखील मोठा परिणाम झाल्याचे जाणवत होते. 

जनावरांचा बाजार सुरू करावा यासाठी व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व लोकप्रतिनिधी यांच्याकडे देखील पाठपुरावा केला परन्तु मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पशुवैद्यकीय विभागाकडून जनावरांचा बाजार बंद ठेवण्याचे बाबतचे पत्र दिल्याने संबंधित पदाधिकारी व लोकप्रतिनिधी याना बाजार सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात अडथळा येत होता.वास्तविक पाहता तालुका पशुसंवर्धन विभागाने जनावरांना होणाऱ्या लंपी आजाराचे प्रमाण कमी झाल्याने याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवत पशुपालकांची अडचण दूर करणे गरजेचे होते.परन्तु तसे न झाल्याने अखेर पशुपालक व व्यापारी यांनाच रोगाची खबरदारी घेत रविवारी बाजार सुरू करावा लागला.

आजच्या बाजारात जनावरे कमी अली असली तरी पुढील आठवड्यात नाकी जनावरांची खरेदी-विक्री वाढून पशुपालक व व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान थांबेल अशी आशा उपस्थित व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. 

जनावरांचा आठवडा बाजार सुरू झाल्याने व्यापारी व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.जनावरांचा बाजार भरला असल्याने मी स्वतः बाजारात जाऊन पशुपालक, व्यापारी व शेतकरी यांच्याशी संपर्क साधला.त्यांना लंपी आजाराची व करोना महमारीची दक्षता घेत स्वतःची काळजी घरून खरेदी-विक्री चालू ठेवावी आशा सूचना केल्या. माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील

Post a Comment

0 Comments