google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खड्ड्यातील माती न काढताच सांगोला - महूद रस्त्याची मलमपट्टी

Breaking News

खड्ड्यातील माती न काढताच सांगोला - महूद रस्त्याची मलमपट्टी

 खड्ड्यातील माती न काढताच सांगोला - महूद रस्त्याची मलमपट्टी

By शब्दरेखा एक्सप्रेस| Published: December 11, 2020 4:49 AM


सांगोला : महूद-सांगोला रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे व चाऱ्यांची तात्पुरती मलमपट्टी सुरू आहे. हे करत असाताना खड्ड्यातील माती काढली ...

खड्ड्यातील माती न काढताच सांगोला - महूद रस्त्याची मलमपट्टी

सांगोला : महूद-सांगोला रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे व चाऱ्यांची तात्पुरती मलमपट्टी सुरू आहे. हे करत असाताना खड्ड्यातील माती काढली जात नाही. भरलेली खडी आणि डांबर बाहेर येऊन पुन्हा खड्डा होणार असून, या डागडुजीसाठी दिलेला निधी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारास निविदेप्रमाणे खड्डे बुजविण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी सांगोला तालुका शिवसेनेने केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून ठेकेदारामार्फत या रस्त्यावर खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, या रस्त्यावरील महाजन फाटा - ढाळेवाडी चौकीपर्यंत ठेकेदारामार्फत खड्डे व चाऱ्या बुजविण्याचे काम सुरू आहे.

चालू वर्षी जून - ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगोला- महूद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. २० किलाे मीटर अंतरात जीवघेणे खड्डे व चाऱ्या पडल्या आहेत. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे वाढल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांनी केली होती.

खड्ड्यातील माती न काढताच थेट लहान खडी टाकून त्यावर डांबराचा मुलामा देत आहेत. अशा तात्पुरत्या मलमपट्टीमुळे या ठिकाणी पुन्हा खड्डे पडणार आहेत. त्यामुळे शासनाचा निधी वाया जाणार आहे. महामार्ग प्राधिकरण अभियंत्याचे खड्डे बुजविण्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.

 सूर्यकांत घाडगे

शिवसेना सांगोला तालुका प्रमुख

ठेकेदारामार्फत दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. त्यांच्यामार्फत डीएलपी अंतर्गत खड्डे बुजवून घेतले जात आहेत. खड्डे बुजविण्याचे काम जर निकृष्ट होत असेल तर चांगल्या पद्धतीने खड्डे बुजवण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या जातील.

भास्कर क्षीरसागर

- उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, सोलापूर.

खड्ड्यातील माती न काढताच सांगोला - महूद रस्त्याची मलमपट्टी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments