google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यातील जनावरांचा आठवडा बाजार तात्काळ सुरू करावा व्यापारी बांधवांची दिपकआबांकडे निवेदनाद्वारे मागणी

Breaking News

सांगोल्यातील जनावरांचा आठवडा बाजार तात्काळ सुरू करावा व्यापारी बांधवांची दिपकआबांकडे निवेदनाद्वारे मागणी


सांगोला : तालुका प्रतिनिधी मार्चपासून कोरोनाच्या महाभयंकर साथीमुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झाले होते. हळूहळू कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊ लागल्याने सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार वगळता सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत, मात्र फक्त जनावरांचा आठवडा बाजार बंद असल्याने छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांवर आणि शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक संकट ओढावले आहे. 

म्हणून सांगोला येथील जनावरांचा बाजार तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी व्यापारी बांधवांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्याकडे केली आहे. मंगळवार 1 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हा व परिसरातील व्यापारी बांधवांनी आपल्या मागणीचे निवेदन दिपकआबांना दिले यावेळी रामचंद्र वाघमोडे बाबुराव सोपे शिवाजी हजारे योगेश थोरबोले सत्यवान गडदे बापू गावडे तुषार वाघमोडे सचिन वाघमोडे दीपक कांबळे भिवाजी गावडे जयवंतराव जगताप रामचंद्र फडतरे सतीश सावंत रावसाहेब शिंदे प्रकाश सावंत दिनकर लांडगे शिवाजी चौगुले भगवान साळुंखे सलीम मुंडे प्रकाश साळुंके हनुमंत साळुंखे आबासो गेजगे विष्णुपंत गेजगे रमेश गेजगे आदींसह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते. सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार जनावरांसाठी प्रसिद्ध समजला जातो. 

या बाजारात मिरज, कराड, पेठ वडगाव, मुरगुड, मोडनिंब, वैराग, बार्शी, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी आदींसह परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी व व्यापारी दर आठवड्याला दाखल होत असतात. प्रत्येक बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. गेल्या नऊ महिन्यापासून हा आठवडा बाजार बंद असल्याने प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे छोटे-मोठे व्यापारी व शेतकऱ्यांची उपासमार होऊ लागली आहे. म्हणून शेतकरी व व्यापारी बांधवांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार सुरू करावा. अशी विनंती व्यापारी बांधवांना मा आमदार दिपकआबांकडे केली.

Post a Comment

0 Comments