सांगोला: - सांगोला तालुक्यातील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय सध्या आपल्या कर्तत्वाने चर्चेत आहे . या कार्यालयातील काही कर्मचारी शासकीय नियमाप्रमाणे कमी , पण आपल्या नियमाप्रमाणे जास्त कामे करताना दिसत आहेत . यातील एक नियमबाज कर्मचाऱ्याने तर कार्यालयात काम घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या प्रकरणात * चूका काढा पैसे कमवा ' असा नवीन फंडा चालु केला आहे . मागेल तेवढं पैसे देऊन लोकं आपलं काम करून घेत आहेत .
लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याविषयी जास्त ज्ञान नसल्याने आणि वरिष्ठ काहीच हरकत घेत नसल्याने हा कर्मचारी लोकांचा फायदा उचलत आहे . भूमिअभिलेख कार्यालयात जाणाऱ्या सर्वसामान्य लोकांना प्रत्येक कायद्याविषयी माहिती असतेच असे नाही , ग्रामीण भागातील कित्येक लोकांना अर्ज सुद्धा लिहायला येत नसतो . या कार्यालयात आपलं काम घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना काही कर्मचारी योग्य मार्गदर्शन करतात आणि त्यांचे काम करून देतात .मात्र या ठिकाणचा एक नियमबाज कर्मचारी लोकांच्याप्रकरणात चुका शोधण्यात तज्ञ असल्याचं बोललं जात आहे . बर हा कर्मचारी चुका शोधून त्यावर भले मोठे आणि क्लेशदायी उपाय सांगतो .मग ते उपाय आपल्या आवाक्याबाहेर असल्याने लोकं संबंधित कर्मचाऱ्यासच पर्याय सुचवण्याचा सल्ला देतात आणि हा बहाद्दर तोंडात येईल त्या रकमेची मागणी करून सोपा उपाय सांगून काम करून देतो . म्हणजे आजार ही सांगतो हाच आणि उपाय ही सांगतो हाच . बर हा खटाटोप कशासाठी तर अतिरिक्त पैशासाठी . मुळात प्रकरणात काहीच उणिवा नसतात आणि असल्या तरी त्याला साधे पर्याय असतात पण हा बहाद्दर लांबचा पर्याय सांगत असल्याने लोकं घाबरून पैसे देण्यास तयार होतात . लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याविषयी लोकांना जास्त माहिती नसल्याने या बहादराने आपला चांगलाच जम बसवला आहे . याला कारणीभूत लोकांचे अज्ञान आणि वरिष्ठांचे कच खाऊ धोरण . काही सुज्ञ लोकांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत मात्र कोणतीच कारवाई होत नसल्याने हे सगळं खुले आम सुरू आहे . यावर तात्काळ माहीती घेऊन योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे अन्यथा एखादा जाणकार व्यक्ती याठिकाणी नक्कीच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचा आधार घेईल असं बोललं जातं आहे .


0 Comments