google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यामध्ये 17 मतदान केंद्रे उभारण्यात आली

Breaking News

सांगोला पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यामध्ये 17 मतदान केंद्रे उभारण्यात आली

सांगोला पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यामध्ये 17 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून , या 17 मतदार केंद्रांवरून पदवीधर मतदार संघासाठी 3 हजार 899 व शिक्षक मतदारसंघात संघासाठी 1 हजार 307 असे एकूण 5 हजार 206 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत . यासाठी 104 मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिलीसांगोला तालुक्यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदार संघाच्या 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी तालुक्यात एकूण 17 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत . यामध्ये हातीद , ह . मंगेवाडी , पाचेगाव खुर्द , मिसाळवाडी , नलवडे वाडी , जुजारपूर , गुणापावाडी , उदनवाडी , झापाचीवाडी , कारंडेवाडी , राजुरी , वाटंबरे , सोनंद , डोंगरगाव , गळवेवाडी , काशीदवाडी , मानेगाव , निजामपूर , लोणविरे , हणमंतगाव , अकोला व कडलास या 22 गावांमधील 149 शिक्षक मतदारांसाठी व 594 पदवीधर मतदारांसाठी हातीद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , हातीद येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे .


जवळा , बुरंगेवाडी , भोपसेवाडी , आगलावेवाडी , तरंगेवाडी , हांगिरगे , गावडेवाडी , घेरडी , वाकी घेरडी , वाणीचिंचाळे , डिकसळ , नराळे , हबिसेवाडी या 14 गावांमधील 111 शिक्षक मतदारांसाठी व 157 पदवीधर मतदारांसाठी जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , जवळा येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे . कोळा , कोंबडवाडी , किडबिसरी , पाचेगाव , जुनोनी , काळूबाळूवाडी , बुद्धेहाळ , कारंडेवाडी , गौडवाडी , चोपडी , बंडगरवाडी या अकरा गावांमधील 111 शिक्षक मतदारांसाठी व 273 पदवीधर मतदारांसाठी कोळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळा नवीन इमारतीमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले आहे . महूद बु , महिम , कारंडेवाडी , कटफळ , इटकी , खवासपूर , चिकमहूद , लोटेवाडी , नवीलोटेवाडी या 9 गावांमधील 104 शिक्षक मतदारांसाठी व 350 पदवीधर मतदारांसाठी महूद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , महूद बु . येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे . नाझरा , सरगर वाडी , वझरे ,अनकढाळ , चिनके , अजनाळे , लिगडेवाडी , य . मंगेवाडी , बलवडी या 9 गावांमधील 114 शिक्षक मतदारांसाठी व 258 शिक्षक मतदारांसाठी नाझरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाजरा येथे मतदान केंद्र उभे करण्यात आले आहे . सांगोला , चिंचोली , कमलापूर , गोडसेवाडी , वाढेगाव , राजापूर , वासूद , केदारवाडी , मेडशिंगी , बुरलेवाडी , आलेगाव , शिवणे , एखतपुर , वाकी शिवणे , नरळेवाडी , बागलवाडी , सोनलवाडी , अचकदाणी , लक्ष्मीनगर , गायगव्हाण , खिलारवाडी या 21 गावांमधील 628 शिक्षक मतदारांसाठी व 2 हजार 267 पदवीधर मतदारांसाठी सांगोला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे . तसेच संगेवाडी , शिरभावी , मेटकरवाडी , मांजरी , देवकतेवाडी , मेथवडे , देवळे , हलदहिवडी , बामणी , सावे येथील 90 शिक्षक मतदार व पदवीधर मतदारांसाठी संगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र उभारण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक मुख्य अधिकारी व इतर तीन ते चार अधिकारी असे एकूण 104 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली . संपादन :संतोष साठे

Post a Comment

0 Comments