google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला / प्रतिनिधी :- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे भक्तांसाठी खुली होताच वंचित बहुजन आघाडीची पावले पंढरपुरातील विठ्ठलाच्या चरणाकडे वळली

Breaking News

सांगोला / प्रतिनिधी :- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे भक्तांसाठी खुली होताच वंचित बहुजन आघाडीची पावले पंढरपुरातील विठ्ठलाच्या चरणाकडे वळली

 सांगोला / प्रतिनिधी :- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे भक्तांसाठी खुली होताच वंचित बहुजन आघाडीची पावले पंढरपुरातील विठ्ठलाच्या चरणाकडे वळली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी केलेल्या घोषणे नुसार पाडव्या पासून राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली करताच पहिल्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी फटाके फोडून, मिठाई वाटप करीत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद दादा चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले . 


      कोरोना प्रतिबंधासाठी बंद असलेली मंदिरे, व सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे भक्तांसाठी खुली करावीत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील ३१ ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना व इतर वारकरी संघटनांच्या वतीने पंढरपुरात मोठे आंदोलन केले होते. तेव्हा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वारकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी मंदिरे खुली करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आणि नियम तयार झाल्यानंतर लवकरच राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे खुली केली  जातील असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले होते. त्यामुळे राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे खुली करण्याचा निर्णय हा वंचित बहुजन आघाडीच्याच आंदोलनाचे यश असल्याचा दावा प्रदेश प्रवक्ते आनंद दादा चंदनशिवे यांनी केला. 

         याप्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष बबनराव शिंदे, माढा विभागाचे जिल्हा अध्यक्ष गोपाळराव घार्गे देशमुख, मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे वंचित आघाडी कडून लढलेले उमेदवार अॅड. दत्तात्रय खडतरे, माढा विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत बनसोडे, कुमार वाघमारे, सुभाष होवाळ, दिपक जगधने, दिलीप उबाळे, शिवाजी होवाल, सुनील होवाल, अमित गाडे, स्नेहल लोखंडे, दिपक लोंढे, संजय बनसोडे, सचिन काटे, बाबुराव बनसोडे, शरद जाधव, सतिश जाधव, सुनील पगारे, रवि सर्वगौड, दिपक माने, सचिन सोनवणे, विकास जाधव, विनोद तोरणे, आकाश चंदनशिवे, सोहम खडतरे यांचेसह जिल्हा भरातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments