दिव्यांगांची पेन्शन अभावी दिवाळी अंधारात ; प्रशासनाच्या बेफिकिरीचा फटका !
. याउलट मात्र , ज्या सर्वसामान्य गरीब आणि दिव्यांग , निराधार लोकांना स्वतःचा उदरनिर्वाह पेन्शनवर करावा लागतो . त्यांना मात्र , प्रशासनाच्या गैरकारभारामुळे व बेफिकिरीचा फटका निमुटपणे सहन करावा लागत आहे.विशेष करून दिव्यांग , निराधार , विधवा आदींना सरकार व प्रशासनाकडे हक्काच्या पेन्शनसाठी नाईलाजाने अपेक्षेने वागवे लागत आहे.
सांगोला तालुक्यात दहा हजारापेक्षा जास्त निराधार , विधवा , दिव्यांग आदी इतर पेन्शनधारक असून यामध्ये सर्वाधिक मोठी फरपट दिव्यांगबांधवांची होते . दिव्यांग असल्यामुळे ना कोण काम देते , ना कोण आधार देतो.त्यामुळे दिव्यांगाना अनेक वेळा सण , उत्सव पेन्शनच्या रक्कमेच्या आशेवर साजरे करावे लागतात . एका बाजूला जीवनावश्यक गरजा, वस्तूंच्या गगनाला भिडणाऱ्या किमती तर दुसऱ्या बाजूला फक्त हजार रुपये मध्ये जगा ' म्हणून दिली जाणारी पेन्शन यामध्ये सध्याच्या प्रचंड विरोधाभास दिसून येते . अनेक वेळा पेन्शन मंजुरीसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात त्यानंतर कागदांची पूर्तता करून पेन्शन खात्यावर आली की नाही ? बगण्यासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत .
अत्यंत अल्प पेन्शन मिळूनही बुडत्याला काडीचा आधार ' म्हणून अनेक जण पेन्शनची वाट पाहत असतात . तसेच बँकेत गेले की अधिकारी व कर्मचारी यांचा साहेबी थाट आणि बोलले पण ताट ' तर दुसऱ्या बाजूला संबंधित पेन्शन विभागाकडे चौकशीसाठी गेले असतात दिव्यांग बांधवांना फारसा चांगला अनुभव येत नाही . सर्वसामान्य लोकांना बँकेत नीट वागणूक दिली जात नाही मग दिव्यांगांना कशा प्रकारची वागणूक मिळत असेलही बाब नक्कीच आत्मचिंतन करावयास लावणारी आहे.
कोरोनामुळे पिचलेल्या दिव्यांगांना दीपावलीसारखा वर्षातील मोठा सण सुखाने आणि आनंदाने करता येईल अशी अपेक्षा असताना काही दिव्यांग बांधवांना तीन महिन्याची पेन्शन अद्यापही मिळाली नाही तर काही दिव्यांग बांधवांना दोन महिन्याची पेन्शन मिळाली नाही.त्यामुळेच वर्षभरातील मोठ्या सणाच्या आनंदावर प्रशासन आणि सरकारच्या बेफिकरी पणामुळे अंधाराचे सावट निर्माण झाले.पेन्शन वेळेवर मिळत नसल्याने जगणे झाले संघर्षाचे.त्यामुळे शासनाने दिव्यांगांना पेन्शनसाठी प्रतीक्षा करावयास लावू नये , अशी अपेक्षा दिव्यांग बांधवांची आहे .


0 Comments