छत्रपती शिवाजी चौक येेेथील नूतन अश्वारूढ पुतळ्यास खासदार छत्रपती संभाजी राजे यांंची सदिच्छा भेट.
छत्रपती शिवाजी चौक येेेथील नूतन अश्वारूढ पुतळ्यास खासदार छत्रपती संभाजी राजे यांंची सदिच्छा भेट.
शासनाने भक्कम बाजू मांडून लवकरात लवकर आरक्षण स्थगिती उठवावी--खासदार छत्रपती संभाजी राजे
सांगोला (सांगोला शब्दरेखा एक्स्प्रेस संतोष साठे)
सांगोला येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नूतन बांधकामास खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सदिच्छा भेट देऊन पुतळ्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. पूरग्रस्त पंढरपूरला भेट देण्यासाठी निघाले असता त्यांनी सांगोला येथे धावती भेट दिली.या वेळी असंख्य शिवप्रेमी तरुण उपस्थित होते.
या प्रसंगी पत्रकारांशी वार्तालाप करताना छत्रपती संभाजी महाराज मराठा आरक्षणासंदर्भात म्हणाले की,शासनाने आपली बाजू न्यायालयासमोर भक्कमपणे मांडावी, आणि मराठा समाजाला न्याय द्यावा.सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारच्या माध्यमातून आरक्षण स्थगिती उठवावी अशी विनंती केलेली आहे.
या वेळी बापूसाहेब भाकरे,गुंडादादा खटकाळे,अरविंद केदार,अजय सिंह इंगवले,प्रताप इंगोले, ऍड गजानन भाकरे,निसार तांबोळी अण्णासाहेब मेटकरी,वैभव केदार, ,इंजि रमेश जाधव,इंजि.भोसले,प्रविण मराळ,महेश नलवडे,सोमेश यावलकर,निसार तांबोळी, पत्रकार सीमा इंगोले,सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते,आणि शिवप्रेमी मंडळ सांगोलाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments