google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Shabdhrekha Express www.shabdhrekhaexpress.in

Breaking News


 

ढगफुटी : शासकीय सोपस्कार न करता तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्या!

  • राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. श्रीहरी बागल यांची मागणी

पुणे / प्रतिनिधी :- परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. महाराष्ट्रात ढगफुटीने शेतीचे संपूर्ण नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गाने जगायचे कसे हे कळत नाही. तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी कोणतेही कायदेशीर सोपस्कार न करता तत्काळ सरसकट शेतकरी वर्गाच्या खात्यावर रक्कम जमा करावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. श्रीहरी बागल यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments