*पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्री दौरा करावा व तात्काळ मदत जाहीर करावे :-लक्ष्मण मोहन खंदारे* परतीच्या पावसाने राज्याला झोडपले काडले असून नदी-नाल्यांना महापूर आलेला आहे.राज्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झालेले असून काढण्यासाठी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करावा जाने करून लोकांना दिलासा मिळेल परतीच्या पावसाने राज्यात पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेला घास ह्या पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे कर्जबाजारी असलेल्या शेतकरी हताश झाले असून आता ते सरकारच्या मदतीची अपेक्षा करत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी पूरस्थिती असलेल्या भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अंबुज पार्टी ऑफ इंडिया सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष लक्ष्मण मोहन खंदारे यांनी केली
0 Comments