बजाज कॅशबॅक घोटाळा ; संतप्त नागरिकांनी ठोकले बजाज फायनान्स कार्यालयाला टाळे !
सांगोला येथे बजाज फायनान्स या कंपनीकडून गेल्या वर्षभरात प्रतेक वस्तू खरेदीवर ४ व ६ हजार कॅशबॅक ऑफर देण्यात आली होती. या ऑफरसाठी मोबाईल विक्रेते, इलेक्ट्रिकल वस्तू विक्रेते यांनी ग्राहकाकडून या ऑफरसाठी ५०० ते ८०० रुपये जादा घेतले होते. परंतु गेल्या वर्षभरापासून बजाज कंपनी कडून या ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा कॅशबॅक देण्यात आला नाही. बजाज फायनान्स कंपनी ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यावर काही संतप्त ग्राहकांनी बजाज फायनान्स च्या सांगोला येथील कार्यालयास टाळे ठोकले . त्यामुळे बजाज फायनान्स चा कॅशबॅक ऑफर घोटाळा येणाऱ्या काळात नक्कीच चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0 Comments