ब्रेकिंग बातमी ; चोपडी ता.सांगोला येथील वृद्ध महिलेचा वीज पडून मृत्यू
चोपडी ता.सांगोला येथील शकुुंतला खळगे या वृद्ध महिलेचा वीज पडून मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
नाझरा (वार्ताहर ):- शनिवारी दुपारी तीन वाजता झालेल्या वादळी पावसात सांगोला तालुक्यातील चोपडी येथील गणेश नगर भागात राहणाऱ्या शकुंतला बाबुराव खळगे (वय ५५ )यांच्या अंगावरती वीज पडून त्यांचे निधन झाले आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता डाळिंबी च्या बागेतील गवत काढण्यासाठी गेलेल्या शकुंतला खळगे त्यांच्यावर काळाने झडप घातली आहे.पाऊस आल्याने एका झाडाजवळ थांबल्या असताना त्यांच्या अंगावरती विज पडली.तात्काळ त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले असता दवाखान्यात जाण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. सदर घटनेची नोंद सांगोला पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा, मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.अतिशय मनमिळावू स्वभावाच्या शकुंतला खळगे यांच्यावर काळाने घाला घातला.,यामुळे चोपडी परिसरावर शोककळा पसरली आहे.
0 Comments