google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0
Shabdhrekha Express www.shabdhrekhaexpress.in
माळशिरस भागात चोरी , घरफोडी , मोटर सायकल चोरी करणा-या टोळीला माळशिरस पोलिसांनी जेरबंद केले आहे. व त्यांच्याकडून तब्बल २० तोळे सोने , ८ मोटार सायकली , मोबाईल टी.व्ही असा एकूण १२ लाखाचा ऐवज जप्त केला आहे. अशी माहिती निरज राजगुरू उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक विश्वंबर गोल्डे , सहा .पो नि.शशिकांत शेळके यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते . जाधववाडी ( माळशिरस) येथे घनशाम जाधव यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून कपाटाच्या चाव्या ताब्यात घेऊन कपाटातील २० हजार , २ मोबाईल , चोरून नेल्याची घटना दि १६ सप्टेंबर रोजी घडली होती.
याचा तपास करताना सहा पो नि.शशिकांत शेळके यांना खबऱ्याकडून सदरचा गुन्हा सुरज काळे , सुरज जाधव व दोन अल्पवयीन मुलांनी केला असल्याचे समजले . अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली .त्यानुसार सुरज काळे , सुरज जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याबरोबर सातारा , कोल्हापूर , पुणे नगर जिल्यात घरफोडी , मोटार सायकल अश्या अनेक चोऱ्या केल्याचे कबूल केले . चोरून नेलेल्या आठ मोटार सायकली , २० तोळे सोने , ४ मोबाईल , टी.व्ही असा १२ लाख रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे .सदाशिवनगर येथील बियर शॉपी मधून गेल्या २ वर्षापूर्वी दुकानातील ३१ हजार रुपये रोख व दोन मोबाईल तीन इसमांनी दमदाटी करून नेल्याची घटना घडली होती . याबाबत खबऱ्याकडून मिळालेल्या माहिती नुसार गणेश हाके सदाशिवनगर यास ताब्यात घेतले असता वरील गुन्हा दोन साथीदाराच्या सहाय्याने केला असल्याची कबुली दिली आहे .त्यानुसार संदीप लवटे रा.मेडद यास पोलिसांनी अटक केली असून अद्याप सम्राट खरात रा. मलवडी ता माण हा फरार आहे . सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते , अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू व पो नि.विश्वंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पो नि.शशिकांत शेळके , पो कॉ.सचिन हेंबाडे , समाधान शेंडगे , सोमनाथ माने , दत्तात्रय खरात , अमोल बकाल , सैफन अन्सारी.राहुल रूपनवर , शहाजी मोटे , प्रणय शिंदे .गणेश गायकवाड , सचिन डुबल , सुशील साळुखे , अन्वर आतार , मनोहर माने , विजयकुमार भरणे , रवी माने , असिफ शेख सचिन गायकवाड , केशव पवार यांनी केली .
0 Comments