Breaking News

मुंबईतील रिपाइं वर्धापनदिनासाठी सोलापूरच्या कार्यकर्त्यांना टोलमाफीची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सोलापूर जिल्हा सरचिटणीस खंडू सातपुते

मुंबईतील रिपाइं वर्धापनदिनासाठी सोलापूरच्या कार्यकर्त्यांना टोलमाफीची मागणी


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सोलापूर जिल्हा सरचिटणीस खंडू सातपुते

मुंबईकडे रवाना होणाऱ्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या वाहनांना ये-जा दोन्ही मार्गांवर टोलमाफी देण्याची खंडू सातपुते यांची मागणी

सांगोला : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. 

या पार्श्वभूमीवर मुंबईकडे जाणाऱ्या तसेच कार्यक्रमानंतर परतणाऱ्या पक्षाच्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफी द्यावी, अशी मागणी पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस खंडू सातपुते यांनी केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चा वर्धापनदिन सोहळा ३ ऑक्टोबर २०२६ रोजी नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे.

या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा, मंगळवेढा, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांतून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

कार्यकर्त्यांची मोठी वाहने कार्यक्रमासाठी मुंबईकडे जाणार असल्याने प्रवासाचा आर्थिक भार कमी व्हावा, यासाठी संबंधित राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर या वाहनांना विशेष टोलमाफी देण्यात यावी, अशी विनंती खंडू सातपुते यांनी टोल नाका व्यवस्थापनाकडे केली आहे.

वर्धापनदिन सोहळ्यासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांना जाण्या-येण्याच्या दोन्ही मार्गांवर टोलमाफी मिळावी, अशी अपेक्षा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments